, Maharashtra, Corona, Covid, Covid19, Corona Cases in Maharashtra on 3 june 2022, Covid Cases in Maharashtra on 3 june 2022, Covid19 Cases in Maharashtra on 3 june 2022">" catLevel="गावगाडा" catLevelIds="15792" stroyTagsIds="35241|16611" storyTags="कोरोना|महाराष्ट्र" ga_sent="0" playerGA="0" totalStry="1">

महाराष्ट्रात CORONA च्या केस पुन्हा 1000 पार, केंद्राने 5 राज्यांना पाठवलं नोटीस

Corona Cases in Maharashtra :देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 3 जून रोजी देशात 4 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली, जी गुरुवारपेक्षा 8.9 टक्क्यांनी जास्त आहे. त्यापैकी ३३.९ टक्के प्रकरणे एकट्या केरळमध्ये आहेत. येथे 1,370 नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून कोरोनाचे अधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.

Corona cases cross 1000 again in Maharashtra, Center warns by writing a letter to state
महाराष्ट्रात CORONA च्या केस पुन्हा 1000 पार, केंद्राने 5 राज्यांना पाठवलं नोटीस ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून कोरोनाचे अधिक रुग्ण आढळले आहेत.
  • यामध्ये तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.
  • या राज्यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई : आज पुन्हा महाराष्ट्रात एक हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. काल कोरोना रुग्णांची संख्या १०४५ होती, तर आज ११३४ नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय तीन जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. (Corona cases cross 1000 again in Maharashtra, Center warns by writing a letter to state)

अधिक वाचा : 

मुंबईत कोविड-19 रुग्ण  शोधण्यासाठी चाचण्या वाढविण्याच्या BMC आयुक्तांच्या सूचना 

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. 3 जून रोजी देशात 4 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली, जी गुरुवारपेक्षा 8.9 टक्क्यांनी जास्त आहे. त्यापैकी ३३.९ टक्के प्रकरणे एकट्या केरळमध्ये आहेत. येथे 1,370 नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून कोरोनाचे अधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला 

महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी संध्याकाळी कोविड टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. त्यात ते म्हणाले होते की, गेल्या दीड महिन्यात राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सात पटीने वाढली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कोरोनाचे नियम पाळण्याचे आणि मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच निर्बंध टाळायचे असतील तर कोरोनाचे नियम जरूर पाळा, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी