कोरोनाची सेल्फ टेस्टिंग लपवणे आता कठीण, BMC ची मार्गदर्शक तत्त्वे जारी

BMC New Guidelines For Covid Test : बीएमसीने सांगितले की काही प्रकरणांमध्ये होम टेस्ट किटचा निकाल ICMR ला कळवला गेला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना रुग्णांवर लक्ष ठेवणे कठीण झाले आहे.

 Corona's self-testing now difficult to hide, BMC guidelines issued
कोरोनाची सेल्फ टेस्टिंग लपवणे आता कठीण, BMC ची मार्गदर्शक तत्त्वे जारी ।  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बीएमसी ने रॅपिड एंटीजन टेस्टिंग आणि होम टेस्टसाठी गाइडलाइंस जारी केल्या
  • बीएमसी टीम ICMR वेबसाइट आणि अॅपवर दररोज डेटा अपलोड करेल
  • चूक आढळून आल्यास वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक कारवाई करेल.

मुंबई  : ओमिक्रॉन या कोरोनाचे नवीन व्हेरिटन्टचा संसर्ग वाढल्यानंतर मुंबईत सेल्फ टेस्टिंगच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत फार कमी लोक बीएमसीला या चाचणीची माहिती देतात. बीएमसीने शुक्रवारी रॅपिड एंटीजन टेस्टिंग आणि होम टेस्टबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यामुळे आता सेल्फ टेस्टिंगची माहिती लपवणे कठीण होणार आहे. या अंतर्गत बीएमसीने उत्पादक, वितरक, मेडिकल स्टोअर्स, दवाखाने आणि केमिस्ट - या सर्वांची रॅपिड एंटीजन टेस्टिंग आणि होम टेस्ट किट्सची जबाबदारी निश्चित केली आहे. या सर्वांना दररोज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बीएमसी आणि एफडीएला ई-मेलद्वारे माहिती द्यावी लागेल. नंतर BMC संपूर्ण माहिती ICMR वेबसाइटवर अपलोड करेल.

फार कमी लोकांकडून रिपोर्टची माहिती 

मुंबईत ३ लाख लोकांनी सेल्फ टेस्टिंग केल्याचे बीएमसीने नुकतेच सांगितले होते. त्यापैकी केवळ ९८,९५७ लोकांनी अॅपवर अहवाल अपलोड केला आणि ही माहिती बीएमसीला दिली. दोन लाखांहून अधिक लोकांनी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे हे बीएमसीला सांगितले नाही. त्यानंतरच बीएमसीने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबाबत बोलले होते.

बीएमसीची विशेष टीम डेटावर लक्ष ठेवणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाकडे देण्यात आली आहे. त्याआधारे एफडीए आयुक्त मुंबईतील वितरण आणि सर्व मेडिकल स्टोअर्स, केमिस्ट आणि दवाखान्यांवर लक्ष ठेवणार आहेत. सर्व केमिस्ट किट खरेदीदारांना बिल देतील आणि त्यांचे रेकॉर्ड ठेवतील.

कुठे सांगावे

whogmp.mahafda@gmail.com वर एफडीए आयुक्तांना मेल करून
BMC ला mcgm.hometests@gmail.com वर मेल करून

कधी सांगायचे

दररोज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत


कोणाची जबाबदारी

FDA आयुक्त मुंबईतील वितरक आणि सर्व मेडिकल स्टोअर्स, केमिस्ट आणि दवाखान्यांवर लक्ष ठेवतील
बीएमसी टीम उत्पादक, वितरक, केमिस्ट, वैद्यकीय आणि दवाखान्यांकडील डेटा गोळा करेल
बीएमसीची वॉर्ड टीम ICMR वेबसाइट आणि अॅपवर रोजचा डेटा अपलोड करेल

कोण कारवाई करेल

चूक आढळून आल्यास वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक कारवाई करेल.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी