Pune Crime News: पुणे हादरलं, भरदिवसा अपहरण करून 7 वर्षांच्या मुलीवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 10, 2022 | 11:23 IST

Pune Molestation News: पुण्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे स्टेशन परिसरात एका 7 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

Pune Crime News
पुण्यात 7 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग 
थोडं पण कामाचं
  • पुणे स्टेशन परिसरात एका 7 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
  • पुणे रेल्वे स्थानक परिसरात या 7 वर्षांच्या चिमुकलीचे वडील चहा विक्रीचा स्टॉल चालवतात.
  • या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

पुणे: Pune Railway station crime News: पुण्यातून (Pune)  एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे स्टेशन परिसरात एका 7 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. रेल्वे स्टेशन स्टॉल चालवणाऱ्या वडिलांना दुपारी जेवणाचा डबा देऊन परतणाऱ्या चिमुरडीवर अतिप्रसंग केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं पुणं हादरलं आहे. 

नेमकी काय घडली घटना 

पुणे रेल्वे स्थानक परिसरात या 7 वर्षांच्या चिमुकलीचे वडील चहा विक्रीचा स्टॉल चालवतात. दुपारी वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी ही मुलगी गेली होती. डबा देऊन परत येत असताना एकानं तिचं अपहरण केलं आणि तिला रेल्वे स्थानकावरील रूममध्ये नेलं. तिथे तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीनं मोठ्या हिंमतीनं आरोपीच्या हातून स्वतःची सुटका केली. यानंतर मुलीनं आपलं घर गाठून घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. 

अधिक वाचा- कोल्हापुरात पावसाचं थैमान,पंचगंगेचं पाणी ही पात्राबाहेर; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात पॉक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेनं खळबळ माजली आहे. 

अपहरण करून नेलं खोलीत 

वडिलांना डबा देऊन परत घरी जात असताना एका अज्ञात आरोपीनं या मुलीचं अपहरण केलं. मुलगी प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या पाठीमागच्या रस्त्यावरील रेल्वे पोलिसांच्या जुन्या कार्यालयाजवळून घरी जात होती. त्यावेळी तिथं बसलेल्या अनोळखी व्यक्तीनं मुलीला उचलून एका खोलीत नेलं. यात खोलीत आरोपीनं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीला आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यास नराधमानं सुरूवात केली. मात्र मुलीनं लघुशंकेला जाऊन येत असल्याचं सांगून स्वतःची सुटका करून घेतली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात तपास केला जात आहे. स्टेशनवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी