Crime News : दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर दुख:चा डोंगर, लाइटच्या माळा लावताना एकाचा मृत्यू

Crime News : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे घरोघरी विद्यूत रोषणाइ करण्यात येत आहे. पवार कुटुंबीय सुद्धा शनिवारी सायंकाळी घराच्या दुसऱ्या मजल्यावर लाइटच्या माळा लावत होते. यावेळी शाॅक लागून एकाचा मृत्यू तर इतर जण जखमी झाले आहेत.

Crime News: One victim was killed while lighting a garland of lighting on the eve of Diwali
Crime News : दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर दुख:चा डोंगर, लाइटच्या माळा लावताना एकाचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वीज वितरणच्या मुख्य लाइनला हात लागल्याने एकाला शाॅक
  • पतीचा मृत्यू, पत्नी आणि त्यांची दोन मुलेही यात गंभीररीत्या भाजून जखमी
  • पत्नी मनिषा आणि मुले श्रवण, ओम यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरू केले आहेत

Crime News | सातारा : दिवाळीच्या सणानिमित्त घरावर लाइटच्या माळा लावत असताना वीज वितरणच्या मुख्य लाइनला हात लागल्याने एकाचा शाॅक लागून जागीच मृत्यू झाला तर पतीला वाचविताना पत्नी आणि त्यांची दोन मुलेही यात गंभीररीत्या भाजून जखमी झाली आहेत. ही दुर्देवी घटना साताऱ्यातील मोरे काॅलनीमध्ये शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. (Crime News: One victim was killed while lighting a garland of lighting on the eve of Diwali)

वीज वितरणची मुख्य लाइनला लागला हात

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे घरोघरी विद्यूत रोषणाई करण्यात येत आहे. पवार कुटुंबीय सुद्धा शनिवारी सायंकाळी घराच्या दुसऱ्या मजल्यावर लाइटच्या माळा लावत होते. त्यांच्या घराजवळूनच वीज वितरणची मुख्य लाइन गेली आहे. या लाइनच्या तारेला सुनील पवार यांचा चुकून हात लागला. त्यामुळे ते तारेला चिकटले.

पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात पत्नी व मुलेही भाजली

हा प्रकार लक्षात येताच पत्नी मनिषा यांनी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्याही त्यांना चिकटल्या. त्यांची दोन्हीही मुले श्रवण आणि ओम हे सुद्धा आई वडिलांच्या मदतीसाठी धावून आले असता त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये हे चाैघेही गंभीररीत्या भाजून जखमी झाले.

प्रकृती चिंताजनक

हा प्रकार लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना तत्काळ साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच सुनील पवार यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी मनिषा आणि मुले श्रवण, ओम यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरू केले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा करत होते. ऐन दिवाळीच्या सणातच पवार कुटुंबावर ओढावलेल्या संकटामुळे साताऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे घरोघरी विद्यूत रोषणाइ करण्यात येत आहे. पवार कुटुंबीय सुद्धा शनिवारी सायंकाळी घराच्या दुसऱ्या मजल्यावर लाइटच्या माळा लावत होते. त्यांच्या घराजवळूनच वीज वितरणची मुख्य लाइन गेली आहे. या लाइनच्या तारेला सुनील पवार यांचा चुकून हात लागला. त्यामुळे ते तारेला चिकटले. दोन्हीही मुले श्रवण आणि ओम हे सुद्धा आई वडिलांच्या मदतीसाठी धावून आले असता त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला.

या विचित्र अपघातामुळे पवार कुटुंबियांवर ऐन दिवाळीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सातारा परिसरात या घटनेमुळे सर्वचजण हळहळ व्यक्त करत आहेत. दिवाळीच्या सणानिमित्त विद्युत रोषणाई, आतिषबाजी, फटाके फोडणे यासारख्या गोष्टी केल्या जातात. मात्र अनेकवेळा या सर्व प्रकारात काही अपघात किंवा दुर्घटनादेखील होत असतात. त्यामुळे नागरिकांनी सणाचा आनंद घेण्याबरोबरच सावधपूर्वक या गोष्टी केल्या पाहिजेत. अन्यथा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी