नवनीत राणांच्या खासदारकीवर संकट, उच्च न्यायालयाकडून जात प्रमाणपत्र रद्द, ठोकणार सर्वोच्च न्यायालयाचं दार

गावगाडा
भरत जाधव
Updated Jun 08, 2021 | 16:47 IST

अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana Caste Certificate Canceled) यांना मुंबई उच्च न्यायालयाने  (High Court Mumbai) चांगलाच धक्का दिला आहे.

Crisis over Navneet Rana's MPship
नवनीत राणा सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोकणार   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao adsul) यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.
  • नवनीत राणांना उच्च न्यायालयाकडून 2 लाखांचा दंड ठोठावला आहे.
  • उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्धात सर्वोच्च न्यायालयात जाणार नवनीत राणा

मुंबई : अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana Caste Certificate Canceled) यांना मुंबई उच्च न्यायालयाने  (High Court Mumbai) चांगलाच धक्का दिला आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने हे प्रमाणपत्र रद्द केले आहे. तसेच, नवनीत राणांना उच्च न्यायालयाने 2 लाखांचा दंड ठोठावला आहे.

खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याबाबत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao adsul) यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर दाव्याचा निकाल आज दिनांक 8 जून रोजी घोषीत करण्यात आला.  दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण सन्मान करतो पण या निकालाविरुद्धात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं नवनीत राणां यांनी एनएआयला सांगितलं.  

उच्च न्यायालयाने हा घटनेवरील घोटाळा आहे, असे मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना 2 लाखाचा दंड ठोठावला आहे. तसंच सदरचं खोटं जात प्रमाणपत्र 6 आठवड्याच्या आत शासनाला जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने अॅड.सी.एम्.कोरडे, अॅड.प्रमोद पाटील व अॅड.सचिन थोरात यांनी बाजू मांडली. जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे नवनीत राणा यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी