Harbour Line Trains Delayed: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, CSMT ला लोकलचा डब्बा रूळावरून घसरला

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 26, 2022 | 11:07 IST

Mumbai Local Derailment at CSMT: एक रेल्वे अपघाताची (Train accident) बातमी समोर येतेय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) लोकल रुळांवरून घसरल्याची माहिती मिळतेय.

CSMT-Panvel Local Train Coach Derails
सीएसएमटी रेल्वे स्थानकात अपघात 
थोडं पण कामाचं
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) लोकल रुळांवरून घसरल्याची माहिती मिळतेय.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून पनवेलसाठी लोकल फ्लॅटफॉर्मवरुन निघाली.
  • लोकल ट्रेन थेट बंपरवर जाऊन आदळली.

मुंबई: CSMT-Panvel Local Train Coach Derails: एक रेल्वे अपघाताची (Train accident) बातमी समोर येतेय.   छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)  लोकल रुळांवरून घसरल्याची माहिती मिळतेय. लोकल मागे घेताना हा प्रकार घडल्याचं समजतंय. यामुळे सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावरील (CSMT-Panvel Harbor route)  वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून पनवेलसाठी लोकल फ्लॅटफॉर्मवरुन निघाली. त्यानंतर लोकल ट्रेन पुढे जाण्याऐवजी मागे गेल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. लोकल ट्रेन थेट बंपरवर जाऊन आदळली. यामुळे पनवेल लोकलचा एक डब्बा रुळावरून घसरला आहे. या अपघातामुळे सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. 

अधिक वाचा-   गोळीबारानं हादरला 'हा' देश, संशयितासह तीन लोकांचा मृत्यू; इतर दोन जखमी

ट्रेन रूळावरून घसरल्यानंतर काही डबे प्लॅटफॉर्मला धडकले. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील काही लाद्याही तुटल्याचं समजतंय. सीएसएमटी रेल्वे स्थानकात केवळ 2 प्लॅटफॉर्म हार्बर मार्गासाठी आहेत. त्यातल्या एका प्लॅटफॉर्मवर हा अपघात झाल्यानं एकच प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. पनवेल वाशी रेल्वे सेवा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.  

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी 9 वाजून 39 मिनिटांनी CSMT वरुन पनवेलला जाणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर होती. तिला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर लोकल पुढे जाण्याऐवजी ती लोकल मागे आली आणि बफरला धडकली. यामध्ये कोणलाही दुखापत झाली नसल्याची माहिती रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. या अपघातात लोकलचा मागून चौथा कोच रुळावरुन घसरला आहे. सर्व प्रकारच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आता कोच पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं शिवाजी सुतार यांनी सांगितलं. 

एबीपी माझाच्या वृत्ताच्या आधारे, शिवाजी सुतार म्हणाले की,  CSMT वर हार्बर मार्गासाठी दोन प्लॅटफॉर्म आहेत. प्लॅटफॉर्म एक हा लोकलचा कोच पुन्हा रुळावर येईपर्यंत बंद राहणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर दोनवरुन वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती सुतार यांनी दिली.  मात्र काही काळ हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार असल्याचंही ते म्हणालेत.

लोकल ट्रेन वडाळा स्थानकात थांबवल्या

हार्बर मार्गावरील लोकलची संख्या काही काळासाठी कमी करण्यात आली असून CSMT ला येणाऱ्या काही लोकल वडाळा स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. तर काही लोकल वडाळ्यावरुन सोडण्यात येतील. सीएसएमटीवरुन गोरेगावला जाणाऱ्या काही लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती ही शिवाजी सुतार यांनी दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी