BHANDARA । रस्त्यावर खतरनाक थरार; वाळू माफियांनी तहसीलदारांच्या गाडीवर जेसीबी अन् गोळीबार...

भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. नदीतून सुरू असलेला वाळू उपसा थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तहसीलदांच्या अंगावर जेसीबी चढविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत तहसिलदार मागे सरल्याने त्यांचा जीव वाचला.

Deadly attack by sand mafia on Tehsildar Bhandara
BHANDARA रस्त्यावर खतरनाक थरार; वाळू माफियांनी तहसीलदारांच्या गाडीवर जेसीबी अन् गोळीबार...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वाळू माफियांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला
  • जेबीसी अंगावर घालण्याचा प्रयत्न
  • मोहाडी तहसीलदारांनी केला हवेत गोळीबार

भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी येथे वाळू माफियांनी तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला केला आहे. वाळू माफियांनी तहसीलदार दीपक कारंडे यांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं तहसीलदारांनी हवेत गोळीबार केल्याने त्यांचा जीव वाचला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.  (Deadly attack by sand mafia on Tehsildar Bhandara)

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra : ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं; ऐका घटनाक्रम दस्तुरखुद्द नितीन राऊतांकडून…

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान मोहाडी तहसीलदार दीपक कारंडे यांना रोहा या गावी साठवलेली वाळू जेसीबीद्वारे डंबर मध्ये भरून चोरी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. तहसीलदार कारंडे यांनी कर्मचाऱ्यांसह रोहा येथे प्रत्यक्षात भेट दिली असता वाळू चोरीचे काम सुरू होते. तहसीलदारांनी हे काम थांबवण्यास सांगितले असता जेसीबी चालकाने त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्या द्वारे हल्ला चढविला मात्र तहसीलदार यांनी स्वतःचा बचाव केला, त्यानंतर जेसीपी चालकाने तिथून जेसीपी घेवून पळ काढला.

अधिक वाचा : BMC Contract : मुंबईला खड्डेमुक्त करण्याची योजना लांबणीवर, 5800 कोटी रुपयांचे कंत्राट मुंबई महानगरपालिकेकडून रद्द

तहसीलदारांनी त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जेसीबी चालकाने पुन्हा त्यांच्या गाडीवर जेसीबीच्या पंज्याने जीव घेणा हल्ला केला. दोनदा झालेल्या जीवघेणा हल्ल्यामुळे तहसीलदार यांनी स्वतःच्या संरक्षणार्थ त्यांच्याकडे असलेली लायसनधारक बंदुकीने हवेत गोळीबार केला. गोळीबार होताच जेसीबी चालक घाबरून जेसीबी तिथेच सोडून पळून गेला. या संपूर्ण घटनेची माहिती तहसीलदार यांनी मोहाडी पोलिसांना दिल्यानंतर मोहाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अधिक वाचा : Dharmveer Sequel  : दिघेंच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार? 2024 ला येणार धर्मवीरचा पार्ट -2

बेकायदा वाळू उपसा करणारा जेसीपी आणि डंपर ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्यासह घटनास्थळी जाऊन चौकशी केली. मोहाडी तहसीलदार दीपक कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जेसीबी चालक, मालक, तसेच टिपर चालक आणि मालक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला गेला असून सध्या जेसीपी चालकाला अटक करण्यात आलेली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी