महाबळेश्वरला जायचं ठरवलंय, थांबा; आधी ही बातमी वाचा....

संततधार पावसाने महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर बगीचा कॉर्नरनजीक पाणी आल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ मंदावली. महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णालेक तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. वेण्णा नदीच्या ओसंडून वाहत आल्याने लिंगमळा परिसर जलमय झाला होता. त्याुळे वाहतूक मंदावली आहे. तसेच धुक्यामुळे वाहन चालकांना मार्ग काढत असताना चांगलीच कसरत करावी लागली.

Decided to go to Mahabaleshwar, wait; Read this news first ....
महाबळेश्वरला जायचं ठरवलंय, थांबा; आधी ही बातमी वाचा....  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाबळेश्वरमध्ये दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती.
  • पावसाने रस्ते जलमय झाले होते.
  • अंबेनळी घाट वाहतूकीसाठी बंद

सातारा : गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्हा विशेषतः महाबळेश्वर, पाटण, जावली व वाई तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यात पर्यटक मोठ्या संख्येने फिरायला येत आहेत. त्यातच अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे. पोलादपूर-महाबळेश्वर रस्ता प्रतापगड फाटा ते मेटतळे घाट दुरुस्तीच्या कारणास्तव रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. (Decided to go to Mahabaleshwar, wait; Read this news first ....)

अधिक वाचा : शिवसेनाला आणखी एक धक्का !, आता उल्हासनगरमधील १५ हून अधिक नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा

सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून महाबळेश्वरला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वरमध्ये मंगळवारी रात्रभर धुवाँधार पाऊस कोसळत होता. १ जून ते १३ जुलै सकाळी ८.३० वाजेपर्यंत २०३१.२ मिलिमीटर एकूण (८० इंच) पावसाची नोंद झाली आहे बुधवारी दिवसभर पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू होती. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत १४८ मिलिमीटर ( ६ इंच) पावसाची नोंद झाली आहे. शहरात कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाली नाही. मात्र पावसाने रस्ते जलमय झाले होते.

अधिक वाचा : Corona in Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे अडीच हजार रुग्ण, १० रुग्णांचा मृत्यू

 महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड गावाजवळ २२ केव्हीची विद्युत लाईनवर पडलेल्या झाडाच्या फांद्या एमएससीबी हटवून विद्युत पुरवठा सुरळीत केला. शिंदोळा येथे दोन दिवसांपूर्वी दरड काढलेल्या ठिकाणीच पुन्हा कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जेएसीबीच्या साह्याने हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत सुरू करण्यात आला. महाबळेश्वर तालुक्यातील बिरवाडी, चतुरबेट, दाभेमोहन घावरी-येरणे रस्त्यावर काही प्रमाणात कोसळलेले दरड बांधकाम विभागाच्यावतीने जेसीबीच्या साह्याने हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. चतुरबेट ते दुधगाव भागातील बंधारा, पूल व नदीचा पाण्याचा प्रवाह येथे मोठ्या प्रमाणावर जमा झालेली लाकडे बांधकाम विभाग व चतुरबेट व दुधगाव गावातील ग्रामस्थांच्या मदतीने बाजूला करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला.

अधिक वाचा : शेतकऱ्याच्या खात्यात पैसे कधी जमा करणार त्याची तारीख सांगा, कोल्हापूरात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा

महाबळेश्वर मध्ये २०२१ च्या जुलैमध्ये अतिवृष्ठी मोठ्या प्रमाणात झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यामुळे तसेच नदीपात्रातून, ओढ्यांच्या पात्रांतून मोठ्या प्रमाणात दगड माती सदृष्य साहित्य रस्त्यावर येऊन जागोजागी रस्त्यावरील मोऱ्यांची व रस्त्यांचे नुकसान झालेले होते. या ठिकाणी सध्या दुरुस्तीची कामे प्रगतीत आहेत. या ठिकाणी पाईप टाकणे व ओढ्याच्या पात्रातील दगड धोंडे काढणे तसेच डोंगर भागाकडील सुटला दगड मातीचा भाग काढणे याकरिता दि. १४ जुलै रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी