आज राज्यातल्या राजकारणात घडणार मोठी घडामोड, 'या' दोन नेत्यांची होणार भेट; चर्चांना उधाण

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 15, 2022 | 07:49 IST

Devendra Fadnavis to meet mns Raj Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) आज भेट होणार आहे.

Raj Thackeray and Devendra Fadnavis
'या' दोन नेत्यांची होणार भेट; चर्चांना उधाण  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • राज्यात शिंदे सरकार (Shinde Government) स्थापन होऊन दोन आठवडे होऊन गेले तरी मात्र राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.
  • देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधी भेट होत आहे.
  • राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस घरी जाणार असल्याचंही बोललं जात आहे.

मुंबई: सध्या राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घटना पाहायला मिळत आहे. राज्यात शिंदे सरकार (Shinde Government) स्थापन होऊन दोन आठवडे होऊन गेले तरी मात्र राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) कधी होणार अशा चर्चा रंगल्या असताना एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) आज भेट होणार असल्याचं समजतंय. या भेटीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधी भेट होत आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. राज ठाकरे (MNS Raj Thackeray Meeting) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज सकाळी 11 वाजता भेट घेणार असल्याची माहिती आहे.  देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वीच भेट होणार होती. पण पावसामुळे ही भेट रद्द करण्यात आली होती. राज्यात भाजप आणि शिंदे गटाचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची पहिल्यांदाच भेट होणार आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस घरी जाणार असल्याचंही बोललं जात आहे. 

अधिक वाचा- आज राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात कोणता Alert, हे आहेत लेटेस्ट अपडेट्स

उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. त्यावेळी राज ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक केलं होतं. त्यानंतर आपण प्रत्यक्ष भेटू असं फडणवीस यांनी राज ठाकरे यांना सांगितलं होतं. त्यानुसार आज या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे.

मनसे आमदाराचा ही भाजपला पाठिंबा 

राज्यात नवीन सरकार स्थापन होत असताना मनसेच्या एकमेव आमदारानं भाजपला पाठिंबा दिला होता. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नव्या सरकारच्या बहुमत चाचणीवेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे या सगळ्या घडामोडींनंतर फडणवीस आणि ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं गुपीत काय असा प्रश्न निर्माण होतोय. तसंच या दोन्ही नेत्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही काही चर्चा होते का हे देखील पाहावं लागणार आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी