Dhananjay Munde car accident: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला किरकोळ मार

Dhananjay Munde car accident news: धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. 

Dhananjay Munde car accident near parali bed district check health live updates in marathi
Dhananjay Munde car accident: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला किरकोळ मार  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात
  • परळीकडे जात असताना रात्रीच्या सुमारास झाला अपघात
  • अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला किकोळ मार लागला

Dhananjay Munde Health updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. बीड जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. (Dhananjay Munde car accident near parali bed district check health live updates in marathi)

धनंजय मुंडे हे आपले कार्यक्रम आटोपून परळीकडे परतत असताना हा अपघात झाला आहे. गाडीच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि गाडीला अपघात झाला. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. धनंजय मुंडे यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने एक ट्विट करत या अपघाताच्या संदर्भात माहिती दिली आहे. हे ट्विट धनंजय मुंडे यांनी रिट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलं, "काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री12.30 वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे साहेबांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे.साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे."

हे पण वाचा : मकरसंक्रातीला बनतोय खास योग, या राशीच्या व्यक्तींना होणार मोठा लाभ

अफवांवर विश्वास ठेवू नये

धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असला तरी त्यांची प्रकृती ठीक आहे. या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने ट्विट करत म्हटलं, साहेबांची प्रकृती ठीक असून, काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.

हे पण वाचा : हिवाळ्यात पुरुषांनी करा हे काम त्वचा होईल मुलायम

उपचारासाठी मुंबईत आणणार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या गाडीला झालेल्या या अपघातात त्यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, असे असले तरी अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईत हलवण्यात येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी