पंकजा मुंडेंच्या ताब्यातील जवाहर एज्युकेशन सोसायटीवर धनंजय मुंडेंची बिनविरोध निवड, भावा-बहिणीत नेमकं चाललंय काय?

गावगाडा
भरत जाधव
Updated Apr 15, 2023 | 22:21 IST

 पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या भावा-बहिणीच्या या संबंधांत नेमकी जवळीकता येतेय की दुरावा?  यावरून बीड आणि मराठवाड्यातील (Marathwada) जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील परळी येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या अखेर निवडणुकीत आमदार धनंजय मुंडे आश्रयदाता सभासद गटात बिनविरोधन निवड झाली आहे. 

Dhananjay Munde elected unopposed to Jawahar Education Society
जवाहर एज्युकेशन सोसायटीवर धनंजय मुंडेंची बिनविरोध निवड 
थोडं पण कामाचं
  • स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासूनची ही सोसायटी आहे.
  • परळी येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीवर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची एक हाती सत्ता होती.
  • जवाहर एज्युकेशन सोसायटीत झालेल्या अनियमिततेवरून धनंजय मुंडे हे न्यायालयात देखील गेले होते.

सुकेशनी नाईकवाडे(बीड): पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या भावा-बहिणीच्या या संबंधांत नेमकी जवळीकता येतेय की दुरावा?  यावरून बीड आणि मराठवाड्यातील (Marathwada) जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील परळी येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या अखेर निवडणुकीत आमदार धनंजय मुंडे आश्रयदाता सभासद गटात बिनविरोधन निवड झाली आहे.  ( Dhananjay Munde elected unopposed on Jawahar Education Society)

अधिक वाचा  : हाडे मजबूत करण्यासाठी आहारात समाविष्ट करा या गोष्टी
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासूनची ही सोसायटी आहे. मात्र आज पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय शत्रुत्व असूनही या सोसायटीवर धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड कशी झाली, यावरून आश्चर्य व्यक्त होत आहे.निवडणुक प्रक्रियेत दि.15 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आश्रयदाता सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. धनंजय मुंडेंच्या  विरोधात एकही अर्ज आला झाला नसल्याने आमदार  धनंजय मुंडे यांची आश्रयदाता सभासद म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.

अधिक वाचा  : अडुळशाच्या पानांचे सेवन करण्याचे हे आहेत फायदे

परळी येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीवर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची एक हाती सत्ता होती. त्यांच्या नंतर मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे यांनी जवाहर एज्युकेशन सोसायटीवर वर्चस्व निर्माण केले. मात्र या वरून बहीण पंकजा आणि भाऊ धनंजय मुंडे यांच्यात नेहमीच वादंग पाहायला मिळाला. जवाहर एज्युकेशन सोसायटीत झालेल्या अनियमिततेवरून धनंजय मुंडे हे न्यायालयात देखील गेले होते.

अधिक वाचा  : ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, शेतकऱ्याचा मृत्यू

12 वर्षानंतर संस्थेसाठी निवडणूक होणार आहे. एकूण 34 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यातील एक जागेसाठी आश्रयदाता सभासद गटातून धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने धनंजय मुंडेंची बिनविरोध निवड झाली आहे.  या सोसायटीसाठी 6 मे रोजी निवडणूक होणार आहे. तर 7 मे रोजी सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

अधिक वाचा  : झोप पूर्ण झाली पण जेवल्यानंतर लगेच येते डुलकी?

या शिक्षण संस्थेची निवडणुक घेण्यात यावी यासाठी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे व प्रा. सदाशिव मुंडे, पंडितराव दौड, उत्तमराव देशमुख, भास्कर मामा चाटे,कुंडलिकराव मुंडे, डॉ. पी. एल. कराड, सुरेश (नाना) फड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिप खाडे यांनी न्यायालयीन लढा लढल्यानंतर धर्मादाय उपायुक्त यांनी 31 मे पर्यंत निवडणुक घेण्याचे आदेश दिले होते.  त्यानुसार दि.15 एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वैद्यनाथ विकास पॅनलचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा आश्रयदाता सभासदमध्ये अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्या जागी एकमेव अर्ज आल्यामुळे आमदार धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली. 

अधिक वाचा  : Horoscope : बारा राशींसाठी कसा असेल रविवारचा दिवस

वैद्यनाथ विकास पॅनलचे एकूण सर्व जागेवर अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच दुसऱ्या जागेसाठीही एकूण 102 अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुक अधिकारी द.ल.सावंत यांनी सर्व कामकाज पाहत आहेत. दरम्यान आज उमेदवारी अर्ज दखल कारण्याच्या शेवटच्या वेळेपर्यंत एकूण 186 विक्रीपैकी 84 उमेदवारांनी 102 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये आश्रयदाता सभासद गटातून 2 उमेदवारी अर्ज, हितचिंतकमधून 2 व्यक्तिचे 2 अर्ज सहाय्यक गटातून 4 व्यक्तिचे 5 अर्ज तर तहहयात गटातून 77 व्यक्तींनी 93  उमेदवारी अर्ज दखल केले आहेत. विशेष म्हणजे आश्रयदाता गटातून धनंजय मुंडे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने त्याची बिनविरोध निवड झाली आहे. 

अधिक वाचा  :कितीही कमाई केली तरी हातात पैसा टिकत नाही?

दरम्यान यासर्व उमेदवारी अर्जाची उमेदवारी नामांकनपत्र छाननी 17 एप्रिल,उमेदवारी नामांकन पत्र परत घेणे 19 एप्रिल,अंतिम उमेदवारी प्रसिध्दी व चिन्ह वाटप 20 एप्रिल रोजी होणार आहे.यानंतर गरज पडल्यास दि.6 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान आणी दि.7 मे रोजी मतमोजणी करण्यात येणार असल्याचे निवडणुक अधिकारी द.ल.सावंत यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी