Osmanabad : ठाकरेंनी ज्यांना ताकद दिली तेच पोहोचले तानाजी सावंतांच्या भेटीला

Shivsena : उस्मानाबाद जिल्ह्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना आव्हान देण्याची जबाबदारी ज्या शिवसैनिकावर दिली तेच काही दिवसात शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

थोडं पण कामाचं
  • ज्ञानेश्वर पाटील शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा
  • तानाजी सावंताच्याविरोधात ताकद देण्याचा प्रयत्न
  • शिवसेनेत मानाचं स्थानही दिलं..

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे. सध्या शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरे यांनी आपले जुने शिवसैनिक माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना बळ दिलं. त्यांनी देखील काही दिवस  असलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात दंड थोपटले. मात्र, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी अशी काही जादूची कांडी फिरवली की तेच ज्ञानेश्वर पाटील आता शिंदे गटाच्या गळाला लागलेत. (Discussion that Dnyaneshwar Patil will participate in the Shinde group)

अधिक वाचा : मुंबईकरांनो ऐकलं का! 15 दिवसांसाठी शहरात लागू होणार संचारबंदी, पण का? जाणून घ्या

बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक अशी ज्ञानेश्वर तात्या पाटील यांची ओळख आहे. मराठवाड्यात शिवसेना रुजत होती. त्यावेळी परांडा ते बार्शी वडापची गाडी चालवणारे ज्ञानेश्वर पाटील बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी प्रभावत झाले. सुरुवातीला परांडा तालुका प्रमुखपदी ज्ञानेश्वर पाटील यांची नियुक्ती केली दिलेल्या संधीचे सोन करत पायाला भिंगरी लावून परांडा - भुम तालुक्यात शिवसेना वाढवली. 

अधिक वाचा : विदर्भातून सारस पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर, नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले

१९९२ झालेल्या परांडा नगर परिषदेत ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर  १९९५ झालेल्या विधानसभा निवडणुकीत भुम परांडा वाशी मतदारसंघातून काँग्रेसचे  आमदार महारुद्र बपा्पा मोटे यांचा ५ हजार मताच्या फरकाने पराभव करत विधानसभा गाठली. नंतर १९९९ मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार झाले. पण २००४, २००९, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. सलग तीन वेळा पराभूत झाल्यानंतर भूम परांडा मतदारसंघात शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या तानाजी सावंतांना संधी दिली.. तानाजी सावंत विधानसभा निवडणूक लढले आणि आमदारही झाले.

अधिक वाचा : Andheri Fire News : अंधेरी पश्चिम स्टेशन परिसरात भीषण आग; चार ते पाच दुकानं जळून खाक

पण शिवसेनेत झालेल्या बंडानंतर तानाजी सावंत शिंदे गटात सामील झाल्याने भूम परंड्यात ज्ञानेश्वर पाटील हे पर्याय ठरु शकतील, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंना होती. म्हणून त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, ज्ञानेश्वर पाटलांमुळे 2024 ला आपली आमदारकी धोक्यात येऊ शकते हे सावंतांच्या लक्षात आल्यानंतर तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांचा डाव उधळून लावण्यासाठी आपली रणनीती आखली. तेच ज्ञानेश्वर पाटील आता ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे जवळपास निश्चित झाला आहे. कारण गेल्या दोन दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर पाटील आणि तानाजी सावंत यांच्यामध्ये मंत्रालयात चर्चा सुरू असल्याचा एक फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी