औरंगाबाद : हनुमान जयंती निमित्ताने आज औरंगाबादमध्ये मनसेच्यावतीने औरंगापुरा परिसरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरात आज हनुमान चालीसा पठण आणि पुस्तकाचे वाटप असा कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Distribution of Hanuman Chalisa books on behalf of MNS in Aurangabad)
अधिक वाचा : उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते की मज्जिदवरील भोंगे काढण्याची घोषणा केली होती, भोंगे न काढल्यास मज्जित समोर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. आज हनुमान जयंती निमित्ताने औरंगपुरा परिसरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे मनसेच्यावतीने हनुमान चालीसा पठणचा कार्यक्रम ठेवला होता.
अधिक वाचा : मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील वाहतूक रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू, अपघाताचा फटका
मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली /E कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मनसे आता ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे चित्र औरंगाबाद शहरात दिसून येत असून मनसेचे कार्यकर्ते यावेळी गर्व से कहो हम हिंदू है असे म्हणत, हनुमान जयंती निमित्ताने भव्य कार्यक्रम औरंगापुरा परिसरात आयोजित करण्यात आले असून यासाठी मनसेचे शेकडो कार्यकर्ते मंदिर परिसरात जमा झाले आहेत. मनसेच्यावतीने हनुमान चालीसा पठणही करण्यात आले. चा कार्यक्रम सुरू झाला असूनसदरील कार्यक्रमामुळे कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची दखल मात्र पोलिस प्रशासनाने घेतली आहे. त्या अनुषंगाने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.