Kalyan Crime News: मुलाला ONGC मध्ये नोकरीला लावतो सांगितलं, कल्याणच्या डॉक्टरला 12 लाखांचा गंडा

गावगाडा
Pooja Vichare
Updated Sep 30, 2022 | 16:11 IST

Kalyan Crime News: डॉक्टरांना विश्वासात घेऊन या भामट्यांनी एकूण 12 लाख रूपयांची रक्कम जानेवारी 2019 पासून ते मार्च 2020 पर्यंत डॉक्टर आणि त्यांच्या मित्रांकडून वसूल केली.

Fraud
ONGC च्या नोकरीसाठी कल्याणच्या डॉक्टरला लावला 12 लाखांचा चुना 
थोडं पण कामाचं
  • ीन भामट्यांनी डॉक्टरला त्याच्या मुलाला आणि तुमच्या मित्राच्या मुलाला रेल्वे, ONGC कंपनीत (ONGC company) कारकून म्हणून नोकरीला लावतो असं सांगितलं.
  • 55 वर्षीय संजय रामदास थोरात असं तक्रारदार डॉक्टरचं नाव आहे. सुरेश आपटे, भरत बाबुराव देशमुख आणि अन्य एक राठोड नावाच्या व्यक्तींनी डॉक्टर थोरात यांची फसवणूक केली.
  • ही संपूर्ण प्रकार श्री गणेश नॅचरोपॅथी सेंटर, महेश रुग्णालय जवळ, पुना लिंक रस्ता, कल्याण पूर्व येथील आहे.

कल्याण: Doctor has been extorted: कल्याणमध्ये एका डॉक्टराला (Doctor ) 12 लाखांचा गंडा लावण्यात आला आहे. कल्याणच्या (Kalyan) पूर्व कोळसेवाडी येथे ही घटना घडली आहे. तीन भामट्यांनी डॉक्टरला त्याच्या मुलाला आणि तुमच्या मित्राच्या मुलाला रेल्वे, ONGC कंपनीत (ONGC company) कारकून म्हणून नोकरीला लावतो असं सांगितलं. डॉक्टरांना विश्वासात घेऊन या भामट्यांनी एकूण 12 लाख रूपयांची रक्कम जानेवारी 2019 पासून ते मार्च 2020 पर्यंत डॉक्टर आणि त्यांच्या मित्रांकडून वसूल केली. त्यानंतरही नोकरी दिली नाही आणि पैसे परत देत नसल्यानं डॉक्टरांनी तिघांविरूद्ध कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

55 वर्षीय संजय रामदास थोरात असं तक्रारदार डॉक्टरचं नाव आहे. सुरेश आपटे, भरत बाबुराव देशमुख आणि अन्य एक राठोड नावाच्या व्यक्तींनी डॉक्टर थोरात यांची फसवणूक केली. ही संपूर्ण प्रकार श्री गणेश नॅचरोपॅथी सेंटर, महेश रुग्णालय जवळ, पुना लिंक रस्ता, कल्याण पूर्व येथील आहे.

अधिक वाचा- आजच आहारात करा या गोष्टींचा समावेश आणि वाढवा Immunity

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी डॉक्टरांशी संपर्क साधला. संपर्क साधून आमची ओनएजीसी कंपनीत ओळख असल्याचं म्हटलं. तिथे कारकूनीच्या जागा भरायच्या आहेत. तिथे तुमच्या मुलाला नोकरीला लावू शकतो. मात्र त्यासाठी काही रक्कम भरावी लागेल, असं सांगितलं. 

डॉक्टर थोरात यांनी आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर डॉक्टरांचा मुलगा अनिकेत याला ओनएजीसीमध्ये नोकरी लागेल या विचारानं भामट्यांना दोन लाख रूपये दिले. हे भामटे एवढे करून थांबले नाहीत तर त्यांनी आमची रेल्वेतही ओळख असल्याचं सांगितलं. यानंतर त्यांनी थोरात यांचा मित्र शेलार यांचा मुलगा गणेश शेलार याला नवी दिल्लीत रेल्वेत नोकरीला लावतो असं ही सांगितलं. 

नोकरीचं काम होणार या विश्वासानं शेलार यांनी आरोपींना 10 लाख रूपये दिले. या आरोपींनी नोकरीला लावण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत असं दाखवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केली ती दाखवली. 

मात्र साडे तीन वर्ष होऊन गेली तरी नियुक्ती पत्र मिळत नसल्यानं काम होणार नाही तर आमचे पैसे परत द्या असा आरोपींकडे तगादा लावला. यानंतर आरोपींनी डॉक्टरांना प्रतिसाद देणं थांबवलं. मग आपली फसवणूक झाली असल्याचं डॉ. थोरात यांच्या लक्षात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी