Omicron मुळं एकाही विद्यार्थ्याला शाळेत बोलावू नका!, शिक्षण विभागाच्या सूचना

Schools, colleges closed : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएन्टचा धोका वाढल्याने राज्य सरकारने शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दहावी आणि बारावी वगळता इतर सर्वांचे ऑफलाइन वर्ग पूर्णपणे बंद राहणार आहेत.

Don't call any students to school because of Omicron!
Omicron मुळं एकाही विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नका!   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ओमिक्रॉन व्हेरिएन्टचा धोका वाढल्याने राज्य सरकारने शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय
  • दहावी आणि बारावी वगळता इतर सर्वांचे ऑफलाइन वर्ग पूर्णपणे बंद राहणार आहेत.
  • उद्यापासून (सोमवारी) एकाही विद्यार्थ्याला शाळेत बोलावू नये, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे (Corona crisis) गेल्या दोन वर्षांपासून देशातील शाळा महाविद्यालयांना टाळे (Schools, colleges closed ) लागले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र,  ओमिक्राॅन वेरिएन्टने (Omicran variant) डोके वर काढल्याने राज्य सरकारने पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार आजपासून दहावी (ssc) आणि बारावी (hsc) वगळता सर्व वर्ग बंद राहणार आहेत. त्यामुळे एकाही विद्यार्थ्याला शाळेत बोलावू नये, अशा सूचना शाळांना केल्या आहेत. (Don't call any students to school because of Omicron!)

कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सोमवारीपासून शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर दिवाळी दरम्यान, राज्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरु झाल्या होत्या. मुले आता शाळेत रमली होती, तेवढ्यात ओमिक्राॅनमुळे कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली. मुंबई, पुणेसह अनेक जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या वाढत गेल्याने खबरदारी म्हणून संपूर्ण शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्यापासून (सोमवारी) एकाही विद्यार्थ्याला शाळेत बोलावू नये, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

महाविद्यालयाच्या परिक्षाही ऑनलाईन पध्दतीने

महाराष्ट्रातली कॉलेजही 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये अकृषी विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांचा समावेश आहे. पण ऑनलाईन माध्यमातून वर्ग आणि शिक्षण सुरू राहणार आहे. ज्या महाविद्यालयांच्या परीक्षा होऊ घातल्या आहेत त्यांनी त्या ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी सूचना राज्य सरकारने दिली आहे. यासोबत जे विद्यार्थी कोरोना बाधित आहेत किंवा वीज उपलब्ध नसल्याने ज्यांना परीक्षेला बसता येणार नाही असे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत याची काळजी महाविद्यालयांनी घ्यावी, असंही सांगण्यात आलेलं आहे.


SSC-HSC प्रात्यक्षिक परीक्षा लांबणीवर?

दहावी- बारावीचा अभ्यासक्रम पूर्णपणे शिकवून झाला. पण दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेतला आहे. दरम्यान, बोर्डाच्या वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक (तोंडी) परीक्षा 14 फेब्रुवारीपासून तर बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारीपासून नियोजित आहे. बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल, तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या काळात होणार आहे. मात्र, कोरोना संसर्गाची संभाव्य स्थिती पाहून वेळापत्रकात बदल होऊ शकतो. प्रात्यक्षिक परीक्षा होईल की नाही, ती लांबणीवर पडेल, असे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी