सत्तासंघर्षात ठाकरेंनी आंबोलीच्या जंगलात तुडवल्या रानवाटा, मनसेचा कोकण दौरा

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून ते सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तीन जिल्ह्यांतील तालुक्यांत जाऊन पक्ष कार्यकर्ते आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधणार.

During the power struggle, Amit Thackeray walked on the Konkan, trampled the forest in the forest of Amboli
सत्तासंघर्षात अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर, आंबोलीच्या जंगलात तुडवल्या रानवाटा ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर
  • पक्ष कार्यकर्ते आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याशी संवाद
  • आंबोली घाटातल्या जंगलात भटकंती

रत्नागिरी : शिवसेनेसाठी मागील एक महिन्यापासून वाईट काळ सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांपाठोपाठ नगरसेवकांची फोडाफोडी करण्यास सुरुवात केली आहे. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. दरम्यान, दुसरे ठाकरे म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर असून प्रत्येक तालुक्यात जाऊन पक्ष कार्यकर्ते आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. सावंतवाडी इथल्या संवाद बैठका संपल्यानंतर सहकाऱ्यांसह आंबोली घाटातल्या चौकुळ कुंभवडे गावाच्या परिसरात गेलो होतो. कोकणचा 'रानमाणूस' श्री. प्रसाद गावडे यांच्यासोबत भटकंती केली. (During the power struggle, Amit Thackeray walked on the Konkan, trampled the forest in the forest of Amboli)

अधिक वाचा : धनुष्यबाण ही निशाणी आपलीच.. त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका: उद्धव ठाकरे

बंडखोरीनंतर शिवसेनेची संघटना पुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न उध्दव ठाकरे मैदानात उतरले आहे.  तर आदित्य ठाकरे मुंबईतील २३६ शाखांना भेटी देणार आहेत. या दौऱ्याला 'निष्ठा यात्रा'असे नाव देण्यात आले आहे. तसेच स्वत: राज्यभरात फिरून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. दुसरीकडे राज ठाकरे आजारी असल्याने मनसेच्या प्रचाराची जबाबदारी अमित ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. जून महिन्यात मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांचा १५ दिवसांत दौरा केल्यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आता आपला मोर्चा कोकणाकडे वळवला आहे. पहिल्या टप्प्यात सात दिवसीय कोकण दौऱ्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तीन जिल्ह्यांचा दौऱ्या करत आहेत.

अधिक वाचा : उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार?, दुपारी 2 वाजता 'मातोश्री'वर पत्रकार परिषद

या दौऱ्यात सिंधुदुर्गात दोन दिवस (५,६), रत्नागिरीत दोन दिवस (७,८) आणि रायगडमध्ये तीन दिवस (९,१०,११ जुलै) असे एकूण सात दिवस अमित ठाकरे तालुका तसेच गाव पातळीवरील स्थानिक मनसे पदाधिकारी तसेच मनविसे पदाधिकारी आणि महाविद्यालयीन तरुण तरुणी यांच्याशी संवाद साधत आहेत. मंगळवारी अमित ठाकरे सावंतवाडी इथल्या संवाद बैठका संपल्यानंतर सहकाऱ्यांसह आंबोली घाटातल्या चौकुळ कुंभवडे गावाच्या परिसरात गेले. कोकणचा 'रानमाणूस' प्रसाद गावडे यांच्यासोबत भटकंती केली. त्याच्याकडून त्यांनी इको-टुरीझमचे महत्त्व जाणून घेतले. 

अधिक वाचा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या अडचणीत वाढ

तसेच कुडाळमध्ये असताना पिंगुळी गावातल्या मिलिंद पाटील यांच्या सह्याद्री बांबू नर्सरीला भेट दिली आणि बांबूच्या विविध प्रजाती, त्याची लागवड आणि त्याचे अर्थकारण समजून घेतले. त्यानंतर कुडाळ एमआयडीसीतल्या कॉनबॅकच्या बांबू प्रक्रिया केंद्राला आणि हस्तकला केंद्रालाही भेट दिली. मोहन होडावडेकर यांच्याकडून बांबू उद्योगाशी संबंधित बारकावे समजून घेतले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी