मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30 जून रोजी पदभार स्वीकारल्यानंतर दिल्लीला रवाना झाले आहेत. आज शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि फडणवीस यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली. महाराष्ट्राचे दोन्ही नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचीही भेट घेणार आहेत. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या मसुद्याला मंजुरी दिली गेली आहे, अशी माहिती समोर येत आहे. (Eknath Shinde and Fadnavis meet PM Modi, approve cabinet expansion formula!)
अधिक वाचा : CM Eknath Shind : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता 'या' परवानगी नंतरच विठूरायाची पूजा करू शकणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोना दिवसात दिल्लीत अनेक नेत्यांची भेट घेतली. ज्यात ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, राजनाथ सिंह आणि अमित शहा यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अमित शहा यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिले की, मला खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही दोघेही महाराष्ट्रातील जनतेची पूर्ण प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने सेवा कराल आणि राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाल.
यांची १२ वाजता भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी एक ते चार दरम्यान पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता दोन्ही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.. या बैठकीनंतर शिंदे व फडणवीस यांनी सोशल मिडियावर भेटीचे फोटो शेअर केले. या भेटीत मुख्यमंत्री शिंदेंनी मोदींना विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट दिली. यावेळी मोदींनी मंत्रीमंडळ विस्तारला ग्रीन सिग्नल दिला आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत शिंदे यांनी आषाढी एकादशीनंतर अधिवेशापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.