बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ गोमूत्रानं शुद्ध करत ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री शिंदेंचा निषेध

गावगाडा
भरत जाधव
Updated Nov 17, 2022 | 11:27 IST

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केली. स्मारकाची पाहणी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘बाळासाहेबांच्या स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील सिव्हील वर्क म्हजेच बांधकाम 50 टक्के पूर्ण झाले आहे. मार्च 2023 आधी या स्मारकाचे काम पूर्ण होईल.

Balasaheb's memorial site was again purified with go mutra
ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री शिंदेंचा निषेध   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यामुळे वाद निर्माण झाला.
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले.
  • बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केली.

Balasaheb Thackeray Smriti Sthal : शिवसेनेतून बंड करत मुख्यमंत्रिपदाची खुर्टी मिळवल्यानंतर एकनाथ शिंदे ठाकरे गटातील शिवसैनिकांचे दुश्मन नंबर वन बनले आहेत. आधी सच्चा शिवसैनिक वाटणारे एकनाथ शिंदे ठाकरे गटासाठी अशुद्ध झाले आहेत. आज शिवसेना प्रमुख (Shiv Sena chief) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचा आज 10 वा स्मृतीदिन (Balasaheb Thackeray Death Anniversary)आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या आदल्यादिवशी जाऊन स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. परंतु त्यांनी दर्शन घेतल्यानंतर ठाकरे गटातील शिवसैनिकांनी स्मृतीस्थळ हे शुद्ध करून घेतले. (Eknath Shinde rebelled and became impure as soon as became Chief Minister, Balasaheb's memorial site was again purified with gomutra)

अधिक वाचा  : Vinayak Meteअपघात : सीआयडीनं चालकाला का मानलं गुन्हेगार

  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या  एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी दादरच्या शिवाजी पार्कमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यामुळे वाद निर्माण झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. एकनाथ शिंदे शिवतीर्थावरुन निघून गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाची जागा शुद्ध करण्यासाठी शिवतीर्थावर गोमूत्र शिंपडलं. 

अधिक वाचा  : मायकेल वॉनच्या टीकेला हार्दिकने दिले सणसणीत उत्तर

यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांसोबत खासदार अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते. दरम्यान  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी एकनाथ शिंदेही स्मृतीस्थळावर अभिवादनासाठी गेले तर शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत आपल्या सर्व आमदारांसह आधीच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं. 

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गद्दारी केल्याने एकनाथ शिंदे ठाकरे गटासाठी ते अशुद्ध झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यातील सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून ठाकरे आणि शिंदे गटात प्रचंड राजकीय संघर्ष बघायला मिळतोय. अनेक ठिकाणी शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आहेत. 

अधिक वाचा  : रिक्षा चालकाकडून अश्लील चाळे,घाबरलेल्या मुलीची रिक्षातून उडी

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे आपल्याला पाठिंबा दिलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन आमदारांचे आणि जनेतेचे आभार मानत होते. विशेषत जनेतेपुढे आपण दगाफटका का गेला याची माहिती देत होते. संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात सभेसाठी मुख्यमंत्री गेले होते. औरंगाबादकडून पैठणकडे जात असताना बिडकीन येथील शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा गेल्यानंतर त्या रस्त्यावर गोमूत्र टाकून त्याला शुद्ध केलं. दरम्यान राज्यातील सत्तेचा कारभार हाती आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे गेले होते. तेव्हाही शिवसैनिकांनी  गोमूत्र टाकून  स्मृतीस्थळ शुद्ध केले होते.  आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मृतीस्थळी गेले होते, तेथे बाळासाहेब यांना अभिवादन केलं. त्यानंतरर तेथून मुख्यमंत्री तेथून गेल्यानंतर शिवसैनिकांनी खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत स्मृतीस्थळ शुद्ध केले. 

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केली. स्मारकाची पाहणी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘बाळासाहेबांच्या स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील सिव्हील वर्क म्हजेच बांधकाम 50 टक्के पूर्ण झाले आहे. मार्च 2023 आधी या स्मारकाचे काम पूर्ण होईल. या स्मारकाचा दुसरा टप्पा महत्त्वाचा असेल. कारण यामध्ये बाळासाहेबांचा राजकीय प्रवास, त्यांची व्यंगचित्र इकडे दाखवली जातील.’तसंच स्मारक लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी