TATA Airbus प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले!, नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde : महाराष्ट्रातून वेदान्त-फॉक्सकॉननंतर टाटा एअरबस हा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली.

Eknath Shinde spoke for the first time after the TATA Airbus project went to Gujarat!
TATA Airbus प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले!  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
  • कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला,
  • आदित्य ठाकरेंच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले

नंदूरबार : महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉननंतर आता टाटा एअर बस प्रकल्पही गुजरातला नेत असल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीकेची झोड उठवत असताना नंदूरबार दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आज पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली. (Eknath Shinde spoke for the first time after the TATA Airbus project went to Gujarat!)

अधिक वाचा : Police Recruitment: नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती, आता पुढे काय? वाचा सविस्तर...

गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातले मोठे उद्योग गुजरातला नेले जात आहेत. अशातच आज नंदूरबाद दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सावध भूमिका घेतली.

अधिक वाचा : Chhagan Bhujbal : टाटाकडे कुणीही टक्केवारी मागणं शक्यच नाही - छगन भुजबळ

एकनाथ शिंदे म्हणाले, “आज राज्यात टाटा एअरबसवरून जो काहूर माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला उत्तर उद्योगमंत्री देत आहेत, योग्य वेळेला मी सुद्धा याची उत्तरं देईल. भविष्यात या राज्यात मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील तरुणांना आम्हाला रोजगार द्यायचा आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रात उद्योग देण्याचे आश्वासन दिले आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवल्याबद्दल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.आदित्य यांनी एकनाथ शिंदे सरकारला "खोके सरकार' असे संबोधले. मी जुलैपासून मागणी करत आहे की 'टाटा एअरबस प्रकल्प' सुरू झाला पाहिजे. महाराष्ट्राबाहेर जाऊ देऊ नका.

आपल्या एका ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी डबल इंजिन सरकारचा खरपूस समाचार घेतला आणि म्हटले की, केंद्र सरकार चांगले काम करत असले तरी राज्य सरकारचे इंजिन बिघडले आहे. आदित्य म्हणाले की, उद्योगाचा सरकारवर विश्वास नसल्याचे यातून दिसून येऊ लागले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी