मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबतच्या याचिकेवर सुनावणी देताना निवडणूक आयोगाला निवडणुकीबाबतचे आदेश दिल्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा केली आहे. राज्यातील नागपूर, वाशीम, पालघर, नंदुरबार, धुळे, आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांसाठी पोटनिवडणुकीचा घोषणा करण्यात आली आहे. (Election Commission announces Zilla Parishad and Panchayat Samiti elections)
अधिक वाचा : विजेच्या तुटवड्याचा मंत्र्यांना फटका; बत्ती गुल होताच मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मुख्यमंत्री गायब
राज्य निवडणूक आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे. पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदान होणार आहे. तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली.
अधिक वाचा :
5 जूनला मतदान होईल तर 6 जूनला मतमोजणी केली जाईल.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पोशेरा (मोखडा, जि. पालघर), हिसाळे (शिरपूर, जि. धुळे), हट्टी खु. (साक्री, जि. धुळे), असली (अक्राणी, जि. नंदुरबार), ब्राम्हणवाडा न- मारसुळ (मालेगाव, जि. वाशीम) आणि चणकापूर (सावनेर, जि. नागपूर) या पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल.