Uddhav Thackeray vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. इतकेच नाही तर शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण हे सुद्धा शिंदेंना मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटात आनंदाचे वातावरण पहायला मिळालं तर उद्धव ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दापोलीत ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडल्याचं दिसून आलं.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर दापोलीत आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांनी तेथील शिवसेना शहर शाखेत घुसून जोरदार घोषणाबाजी केली. योगेश कदम समर्थकांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना शाखेतून बाहेर काढले आणि या सर्व प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला होता. दापोली शिवसेना शहर शाखेत दोन्ही गटाचे समर्थक, कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
हे पण वाचा : या आजारांमुळे वाढते पोटाची चरबी
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आपला गट म्हणजेच शिवसेना असा दावा केला होता. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट आपलीच शिवसेना खरी असल्याचं म्हणत होते. या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे दोन्ही गटांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिले होते. या कागदपत्रांसह दोन्ही गटांनी शिवसेनेवर आपला दावा केला होता. त्यादरम्यान निवडणूक आयोगानं हंगामी निर्णय देताना शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह गोठवत दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह दिले होते. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिली.
हे पण वाचा : Weight Loss: हा डाएट फॉलो करा अन् महिन्याभरात 10 किलो वजन कमी करा
शिवसेना पक्षाच्या घटनेत 2018 मध्ये झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण 2018 मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत, असं सांगत निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला.