बिगुल वाजले!, राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान

Grampanchayat Election : राज्यातील ग्रामपंचायती निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Elections of as many as 7 thousand 751 gram panchayats in the state announced;
बिगुल वाजले!, राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
  • १८ नोव्हेंबरपासून आचारसंहिता
  • स्थानिक पातळीवर आपली ताकद दाखवण्याचा शिंदे आणि ठाकरेंचा प्रयत्न

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाकडून 7 हजार 751  ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. राज्याभरातील या ग्रामपंचातींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं जारी केलेल्या आदेशानुसार १८ नोव्हेंबरला निवडणुकीची नोटीस जारी होईल. त्यामुळे निकाल जाहीर होईपर्यंत ७७५१ गावांमध्ये आचारसंहिता लागू असेल.  (Elections of as many as 7 thousand 751 gram panchayats in the state announced;)

अधिक वाचा : Sanjay Raut: ठाकरे गटाची मुलुखमैदान तोफ पुन्हा धडाडणार, संजय राऊतांना जामीन

या जिल्ह्यात होणार निवडणुका

अहमदगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड,भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी,पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,सोलापूर, वर्धा,ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक जिल्ह्यात ७७५१ ग्रामपंचायतींच्या आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.

अधिक वाचा : Crime News संपत्तीच्या वादातून मुलाने वडील शौचास जाताच शौचालयच दिलं पेटवून

असा असणार निवडणूक कार्यक्रम

संबंधित तहसीलदार 18 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. निवडणुकीतील अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे राबवण्यात येणार आहे. शनिवार व  नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.

अधिक वाचा :  Raigad News: मुंबई-गोवा महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर, कोलाडमध्ये आज चक्काजाम

खरंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाहीत. मात्र विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांसह स्थानिक नेते या निवडणुकीसाठी आपले राजकीय कसब पणाला लावतात. कारण या निवडणुकांमध्ये मिळालेली ताकद पुढे तालुका पातळीवरील निवडणुकीसाठी उपयुक्त ठरते. त्यातच राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या उलथापालथीमुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकींना आक्रमकपणे सामोरे जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेल्या या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकांमध्ये कोणाचं पारडं जड ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी