मुंबई : देशभरात काॅंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असताना महाराष्ट्रात काॅंग्रेस नेत्याच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी केली. (Fadnavis eyes on Congress youth leader! BJP's offer was made in front of Balasaheb Thorat)
अधिक वाचा : Sandeep Deshpande : याचा अर्थ या संघटनेने सुपारी घेतलेली आहे, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा आरोप
काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याला अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बऱ्याच दिवसानंतर एकाच मंचावर दिसणार होते. दरम्यान, अजित पवारांनी दांडी मारली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान, फडणवीसांनी काॅंग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. तसेच अप्रत्यक्षपणे भाजपात येण्याची ऑफरच दिली.
अधिक वाचा : Chandrashekhar Bawankule :संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळे त्यांच्यावर इतर कैद्यांचा प्रभाव - चंद्रशेखर बावनकुळे
पुढं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “बाळासाहेब थोरात तुमच्याकडे एक तक्रार आहे. सत्यजित सारखे नेते, तुम्ही कितीदिवस बाहेर ठेवणार आहात. सत्यजितला जास्त दिवस बाहेर ठेऊ नका, नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे. कारण, चांगली माणसं जमाच करायची असतात,” असा टोला लगावला.