Devendra Fadnavis : बच्चू कडू कसे फुटले?, देवेंद्र फडणवीसांनी सांगितला सगळा घटनाक्रम

Bachchu Kadu Vs Ravi Rana: महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शिवसेनेचे जवळपास 40 बंडखोर आमदार गुवाहाटीला गेले आहेत. त्यावेळी भाजपकडून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरु करत असल्याचा आरोप झाला. तेव्हा सावध भूमिका घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी सरकार पाडण्याची संपूर्ण प्लॅन कसा केला याचा खुलासा केला.

Fadnavis' secret blast; Guwahati, the child became bitter because of my phone
बच्चू कडू कसे फुटले?, देवेंद्र फडणवीसांनी सांगतिला सगळा घटनाक्रम, पाहा Video ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपचा हात
  • पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी दिली कबुली
  • माझ्या एका कॉलवर तत्कालीन मंत्री बच्चू कडू गुवाहटीला गेले

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मंत्री बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील भांडणामुळे राज्याचे वातावरण तापले. अशाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर खुद्द आमदार रवी राणा यांनी जाहीर माफी मागितली. त्यानंतरन आता हा वाद संपल्याचे सांगितले. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकार कसे पडले?, याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. (Fadnavis' secret blast; Guwahati, the child became bitter because of my phone)

अधिक वाचा : पुण्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर; 2000 कोटींची गुंतवणूक येणार, 5000 रोजगार मिळणार

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकरामधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप भाजपने आणला असल्याचा आरोप करण्यात येत होते. तेव्हा भाजपकडून ही पक्षांतर्गत नाराजी असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, आज महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपचा हात असल्याची कबुली दिली.

फडणवीस म्हणाले, बच्चू कडू यांनी सौदा केला म्हणणे चुकीचे आहे. बाकी इतरांचे मी म्हणत नाही. मात्र, बच्चू कडू माझ्या एका कॉलवर गुवाहटीला गेले. मुख्यमंत्री शिंदेवर सर्वांचा भरोसा म्हणून सर्व जण सोबत गेले, असेही यावेळी फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा : Sharad Pawar : शरद पवारांची तब्येत बिघडली, जाणून घ्या नेमकं काय झालं?

आमदार बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहटीला गेले होते. त्यांना मी सांगितले की, आम्हाला सरकार बनवायचे आहे. तुम्ही सोबत हवे आहात आणि ते गुवाहटीला गेले. बच्चू कडू यांनी कुणाशी सौदा केला, काही उलट सुलट केले हे म्हणणे चुकीचे आहे. बाकी इतरांचे मी म्हणत नाही. बाकीच्या आमदारांचे मला माहित नाही. मी केवळ बच्चू कडूंना फोन करून सांगितले म्हणजे बाकीच्या आमदारांनी सौदेबाजी केली असे म्हणत नाही, पण माझ्या फोनवर कुणी गेले नाहीत. माझ्या कॉलवर गेलेले केवळ एकटे बच्चू कडू आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी