farmer brought elephant for son's marriage in maharashtra solapur district : लग्नाच्या निमित्ताने दोन्ही घरातली मंडळी आपापली हौसमौज पूर्ण करून घेतात. हौसेला मोल नाही, प्रत्येकजण ऐपतीनुसार खर्च करतो. महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याने मुलाचे लग्न थाटात करण्याचा निर्णय घेतला. थाटमाट करण्यासाठी शेतकऱ्याने मुलाची वरात हत्तीवरून काढावी असा विचार केला. यासाठी शेतकऱ्याने खूप काटकसर करून लग्नासाठी रक्कम उभी केली. नंतर स्वप्न साकारण्यासाठी शेतकऱ्याने मुलाची वरात हत्तीवरून काढली.
लग्नासाठी वरातीत वऱ्हाडी नाचत होते. वऱ्हाडींसोबत हत्तीवर नवरदेव होता. हत्तीवर बसलेल्या नवरदेवाचा अनेकांना हेवा वाटत होता. हत्तीवर बसलेला नवरदेव आणि पुढे नाचत असलेले वऱ्हाडी हा थाट काही औरच होता. काय थाट केला राव असे कौतुकाने अनेकजण बोलत होते.
सोलापूर जिल्ह्यातले उंदरगाव एक छोटे गाव आहे. या गावात हत्तीवरून वरात ही खूप मोठी बाब होती. यामुळे नवरदेव लग्न मंडपात पोहोचण्याआधीच गावात चर्चेला उधाण आले. अनेकांनी हत्तीवरून लग्नाच्या वरातीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्याचे कौतुक केले.
लग्नाची वरात घोड्यावरून, कारमधून, खेचरावरून, बैलगाडीतून निघाल्याचे महाराष्ट्रातील अनेक गावांनी बघितले आहे. पण हत्तीवरून वरात निघाल्यामुळे शेतकऱ्याचे अनेक ग्रामस्थांनी कौतुक केले.
हत्ती काही तासांसाठी बोलावला तरी मोठा खर्च होणार हे निश्चित होते. पण शेतकऱ्याने हौस भागवण्यासाठी त्या खर्चाचे नियोजन केले. यामुळे हत्तीवरून काढलेली वरात कौतुकाचा विषय झाली आहे. अनेकांनी या वरातीचे फोटो आणि व्हिडीओ आठवण म्हणून काढले आहेत.
या ब्रँडची मूळ नावं माहिती आहेत का?