Farmers Protest: नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक, किसान सभेच्यावतीने राज्यभरात धरणे

Farmer Protest: ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, पीक विमा कंपन्यांनी बाधित शेतकऱ्यांना अग्रिम व अंतिम भरपाई विनाविलंब द्यावी यासह २३ मागण्यांसाठी किसान सभेच्यावतीने २३ नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले.

Farmers Aggressive for Compensation, Statewide Dharnas on behalf of Kisan Sabha
Farmers Protest: नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक, किसान सभेच्यावतीने राज्यभरात धरणे  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत
  • नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक
  • किसान सभेच्यावतीने राज्यभर आंदोलन

मुंबई : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून मुसळधार पावसाने राज्यात धुमाकूळ घातला होता.  तसेच काढणीच्या वेळीही झालेल्या अतिवृष्टीने हातातोंडाची आलेले पिक पाण्याखाली गेले. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला शासनाची मदत न मिळाल्याने तो आक्रमक झाला असून तो किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यभर रस्त्यावर उतरला आहे. (Farmers Aggressive for Compensation, Statewide Dharnas on behalf of Kisan Sabha)

अधिक वाचा : उद्धव ठाकरे कडाडले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा ठाकरी शैलीत घेतला समाचार

 राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति एकर ५० हजार रुपये अर्थसहाय्य द्या, शेतकऱ्यांना रास्त हमी भाव देणारा केंद्रीय कायदा करावा व प्रस्तावित केंद्रीय वीज विधेयक मागे घ्यावे गायरान जमिनी ताबेदारांच्या नावे करा, वनजमिनी, देवस्थान जमिनी कसणारांच्या नावे करा, कर्जमाफी योजनांची अपुरी अंमलबजावणी पूर्ण करा, आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलने सुरू केलेत.
  
ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, अमरावती, वर्धा, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, सोलापूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष्य न दिल्यास २६ नोव्हेंबर रोजी राजभवनांवर विराट मोर्चा काढण्याची हाक किसान सभेच्यावतीने देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी