Mumbai-Goa महामार्गावर कशेडी घाटात भीषण अपघात; रिक्षा चालकासह तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

accident at Kashedi Ghat : रायगड जिल्ह्यात सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. पोलादपूर येथील चोळई जवळ भीषण अपघात वाळूने भरलेल्या डंपरखाली रिक्षा सापडली. यात रिक्षातील चालकासह 4 जणांचा मृत्यू झाला.

Fatal accident at Kashedi Ghat on Mumbai-Goa highway; Three female students died along with the rickshaw driver
Mumbai-Goa महामार्गावर कशेडी घाटात भीषण अपघात; रिक्षा चालकासह तीन विद्यार्थिनींचा मृत्यू ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात
  • पोलादपूरजपळच्या कशेडी घाटात वाळूने डंपर रिक्षावर पलटला
  • चालकासह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

रायगड : मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर नजीक कशेडी घाट रस्त्यावर चोळई गाव हद्दीत भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये रिक्षा चालकासह तीन विद्यार्थीनींचा जागीच मृत्यु झाला आहे.  (Fatal accident at Kashedi Ghat on Mumbai-Goa highway; Three female students died along with the rickshaw driver)

अधिक वाचा : Thane : 'हर हर महादेव' वरुन राडा, जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटगृहातला शो थांबवला

माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील या विद्यार्थीनी रिक्षाने खेड येथे परीक्षेसाठी गेल्या होत्या. परीक्षा आटोपून परतत असताना हा अपघात झाला.  कशेडी घाट रस्त्यातील चोळई गावच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर रिक्षावर उलटला.  त्यात चिरडून चौघांचा मृत्यू झाला. उमर बडुर रिक्षा चालक आणि हलिमा पोतेरे (23 रा. नांदवी), असिया बडुर (20 रा. गोरेगाव) नाजनिन करबेलकर वय 23 रा. टेमपाले अशी मृतांची नाव आहेत.  

अधिक वाचा : Pui Bridge : मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड पुई पूल धोकादायक; सावित्री पूलाप्रमाणे दुर्घटनेची भिती, नवीन पुलाची मागणी

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.  अपघातानंतर घाटातील वाहतूक काही वेळ खोलंबली होती. दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली असून चारही मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी