Washim ! तो ठाकरे गटाच्या महिला नेत्यावर चाकूने वार करत होता, लोक फक्त बघत होते ...

Shivsena : शिवसेनेच्या वाशिम शहर महिला प्रमुखावंर भरबाजारात चाकूने अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

Fatal attack on woman leader of Thackeray group, stabbing with knife
Washim ! तो ठाकरे गटाच्या महिला नेत्यावर तासाभर चाकूने वार करत होता, लोक फक्त बघत होते ...   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महिला शहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला
  • वाशिमच्या बाजारात अज्ञाताकडून चाकूने वार
  • पदाधिकारी गंभीर जखमी झाल्यासून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत

वाशिम : वाशिम शहरात भरदिवसात बाजारामध्ये शिवसेना महिला शहर प्रमुखावर अज्ञाताने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या हल्ल्यात शहरप्रमुख रंजना पौळकर या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Fatal attack on woman leader of Thackeray group, stabbing with knife)

अधिक वाचा : Chitra Wagh : संजय राठोड यांचा विषय संपवूया, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, चित्रा वाघ यांचे एक पाऊल मागे

नेमके काय झाले ?

 वाशिम महिला शहर प्रमुख रंजना पौळकर या मैत्रिणीसह वाशिम शहरातील बाजारात खरेदीसाठी जात होत्या. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका अज्ञाताने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. अनपेक्षितपणे केलेल्या हल्यामुळे काही कळण्याअगोदर हल्लेखोरांने त्यांच्यावर दहा ते पंधरा वेळा वार केले. हा प्रकार ग्रामीण पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर  रस्त्यामध्ये घडला. या हल्ल्यात रंजना पौलकर गंभीर जखमी झाल्यासून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

अधिक वाचा : राजकारणातील कटुता दूर होणार? फडणवीसांनी केलं मोठं विधान

शिवसेनेत फूट पडल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी बदलण्यात आले होते. मागील महिन्यातच रंजना पौळकर यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) महिला शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी