थरकाप उडवणारी घटना ! पोटच्या लेकरासाठी बाप भिडला बिबट्याशी

Leopard Attack Child Injured : कराड तालुक्यातील एका गावात शेतात काम करणाऱ्या पाच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिबट्याने जबड्यात धरलेल्या मुलाला सोडवण्यासाठी वडिलांनी बिबट्याशी दोन हात केले. अखेर बिबट्याने मुलाला टाकून पळ काढला.

Father fights for leopard, shocking incident in Karad taluka
थरकाप ! पोटच्या लेकरासाठी बाप भिडला बिबट्याला, कराडात तालुक्यातील धक्कादायक घटना   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाच वर्षाच्या मुलावर हल्ला केला.
  • झडप घालून मुलाची मान जबड्यात पकडत त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न केला.
  • बिबट्याचा हल्ल्यात मुलाच्या मानेवर आणि पाठीवर खोल जखमा झाल्या आहेत.

सातारा  : वडिलांसोबत शेतात काम करीत असलेल्या एका चिमुरड्यावर बिबट्याने झडप घातली. अवघ्या काही क्षणात त्या चिमुरड्याला आपल्या जबड्यात पकडून भक्ष बनवू पाहणाऱ्या बिबट्यासमोर बाप उभा राहला. बापाने तब्बल दहा मिनिट बिबट्याशी झुंज दिली. आपल्या पोटच्या लेकरासाठी बापाने आपल्याही जिवाची परवा केली नाही. अखेर बिबट्याने हार मानली आणि मुलाला सोडून धूम ठोकली. (Father fights for leopard, shocking incident in Karad taluka)

सायंकाळी बिबट्याची झडप

कराड तालुक्यातील येणपे येथे काही दिवसांपूर्वी एक ऊसतोड मजूराच्या मुलाचा बिबट्याने बळी घेतल्याची घटना ताजी असताना बिबट्याने आणखी एक हल्ला केला. किरपे गावातील धनंजय देवकर हे आपला मुलगा राज (वय ५ वर्षे) याच्यासह शेतात काम करीत होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंधार पडला असता घरी निघण्याच्या तयारी होते. ते दोघे शेतातील साहित्य पिशवीमध्ये भरत असताना अचानक मागून आलेल्या बिबट्याने राजवर झडप घातली.

बापाने बिबट्यावर चढवला हल्ला

बिबट्याने राजची मान जबड्यात पकडून फरपटत नेहण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात राजने ओरडण्यास सुरुवात केली.  राजचा आवाज एेकून बापाने मागे वळून पाहिले असता बिबट्या आपल्या लेकराला भक्ष बनवत असल्याचे लक्षात येताच धनंजयने बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. धनंजय बिबट्यावर तुटून पडला. आणि बिबट्याच्या तोंडातून राजला ओडण्याचा प्रयत्न करु लागला. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर बिबट्याने राजला जमिनीवर टाकून पळ काढला.

सुमारे दहा मिनिट बिबट्या आणि देवकर यांच्यामध्ये सुरु असलेल्या झटापटीचा प्रसंग धरकाप आणणारा असाच होता. या हल्लात राज जखमी झाला असून त्याच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव राक्षक रोहन भाटे, वनपाल व वनरक्षक, किरपे गावचे पोलीस पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी