Lata Mangeshkar Award : पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर, मंगेशकर कुटुंबीयांची माहिती

पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. मंगेशकर कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे. २४ एप्रिल रोजी मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास होकार दिला आहे

lata mangeshkar and narendra modi
लता मंगेशकर पंतप्रधान नरेंद्र मोदी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे.
  • मंगेशकर कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे. 
  • २४ एप्रिल रोजी मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Lata Mangeshkar Awar : मुंबई : पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. मंगेशकर कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे. २४ एप्रिल रोजी मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास होकार दिला आहे अशी माहिती लता मंगेशकर यांच्या बहीण उषा मंगेशकर यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लता मंगेशकर यांना बहीणीसमान मानायचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेल्या कामामुळे हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचेही उषा मंगेशकर यांनी म्हटले आहे. 

लता मंगेशकर यांचे ९२ व्या वर्षी झाले निधन

प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले होते. त्यांना या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला मुंबईतील  ब्रीच कँडी (Breach candy) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सरकारी इतमामात संध्याकाळी साडेसहा वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले . लता दिदींची कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आणि त्यांना न्यूमोनिया झाल्याचेही निदान झाले होते. ल

28 जानेवारीच्या सुमारास,  ज्येष्ठ गायिका लता दिदींच्या तब्येतीमध्ये  सुधारण्याची किंचित चिन्हे दिसल्यानंतर त्यांना  व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. मात्र, ५ फेब्रुवारीला त्यांची  प्रकृती खालावली आणि ती पुन्हा व्हेंटिलेटरवर आली. तिची प्रकृती गंभीर असल्याने, लता मंगेशकर यांच्यावरील उपचार देखरेखी खाली केले जात होते.  लता मंगेशकर यांना प्रेमाने 'नाइटिंगेल ऑफ इंडिया' असे संबोधले जाते. त्यांनी  वयाच्या 13 व्या वर्षी गायनात पाऊल ठेवलं होतं आणि 1942 मध्ये त्यांनी  पहिले गाणे रेकॉर्ड केलं होतं. सात दशकांच्या कारकिर्दीत तिने विविध भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्म मध्य प्रदेशमध्ये इंदूर इथे 28 सप्टेंबर 1929  रोजी झाला होता. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे मराठी रंगभूमीवरील विख्यात गायक आणि नट होते. आपल्या वडिलांकडूनच त्यांना गायनकलेचा वारसा लाभला होता.  लता मंगेशकर यांचे आधी नाव हेमा ठेवण्यात आले होते. नंतर भावबंधन नाटकातील लतिका या पात्रावरून दीनानाथ मंगेशकर यांनी त्यांचे नाव लता असे ठेवले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी