Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षाचा मुलगा ठार, ऊस तोड सुरू असलेल्या शिवारातून अर्धा किलोमीटर अंतर फरपटत नेले

Leopard Attack in Satara : येणके, ता. कराड येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराच्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलाला उसाच्या शिवारात बिबट्यानं उचलून नेलं. काही अंतर गेल्यावर संबंधित मुलाला ठार करून त्याला तिथेच सोडून बिबट्यानं उसाच्या शिवारात धूम ठोकली.

Five-year-old boy killed in leopard attack, Half a kilometer away from the farm where the cane harvesting was going on
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षाचा मुलगा ठार, ऊस तोड सुरू असलेल्या शिवारातून अर्धा किलोमीटर अंतर फरपटत नेले ।  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • येणके, ता. कराड येथे बिबट्याचा हल्ला
  • ऊस तोडणी सुरु असलेल्या शिवारातून पाच वर्षाच्या मुलाला केले ठार
  • मुलाला ठार करून त्याला तिथेच सोडून बिबट्यानं उसाच्या शिवारात धूम ठोकली.

Leopard Attack सातारा : कराड तालुक्यातील येणके येथील एका शिवारात ऊसाची तोडणी सुरु आहे. सोमवारी सकाळी ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरावर बिबट्याने हल्ला केला. यावेळी बिबट्याने अवघ्या पाच वर्षाच्या मुलाला उसाच्या शिवारातून उचलून नेलं. सुमारे अर्धा किलोमीटर अंतर गेल्यावर त्याला मुलाला ठार करुन तिथेच टाकून बिबट्याने धूम ठोकली. या घटनेमुळे परिसरातील गावांमध्ये बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. (Five-year-old boy killed in leopard attack, Half a kilometer away from the farm where the cane harvesting was going on)

परिसरात बछड्यासह बिबट्याचा कळप

काही दिवसांपूर्वी नांदलापूरसह कापीलमळ्यात व धोंडेवाडी परिसरात बछड्यासह बिबट्याच्या कळपाचे शेतकऱ्यांना दर्शन झाले होते. किमान पंधरा दिवसांत एकदा तरी जखिणवाडीसह डोंगराशेजारील गावात बिबट्याचा पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याच्या घटना घडत आहेत. चार दिवसांपूर्वी चचेगावात वृद्ध महिलेवर हल्ला करत जखमी केले. अशा पद्धतीने अगाशिव डोंगर पायथ्याला बिबट्यांचा हल्ला होत होता. 

पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना

आगाशिव डोंगराभोवतीच्या गावात अनेक वेळा बिबट्याने प्राणी ठार केले आहेत. काही महिन्यांत चचेगाव, आगाशिवनगर, जखिणवाडी, धोंडेवाडी, नांदलापूर शिवारात शेतातील वस्तीवरील शेळ्या ठार केल्या आहेत. काही वेळा तर रानातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करत, पाच-पाच शेळ्या ठार केल्या आहेत. त्यामुळे परिसरात किमान महिन्यातून दोनदा बिबट्याचा हल्ला घडत आहेत. आगाशिव डोंगर पायथ्याला मुनावळे गावालगत चार शेळ्या फस्त केल्या होत्या. हा हल्ला एका बिबट्याचा नसून बिबट्यांच्या कळपाचा आसावा,
बिबट्यांच्या कळपाचा आसावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला होता.

शिवारात मुलगा खेळत असताना त्यावर झडप

येणके-किरपे रस्त्यावरील शिवारात आज ऊस तोड सुरु होती. यावेळी या ऊस तोडणी मजूरांचा आकाश बिगाशा पावरा (वय ५) हा काही अंतरावर खेळत होता. त्यावेळी बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. त्याला तोंडात घेऊन बिबट्या घेऊन जात असल्याचे एका मजूराच्या निदर्शनास आले. त्याने इतर मजूरांच्या मदतीने बिबट्याचा पाठलाग केला. बिबट्याने त्या मुलाला सुमारे अर्धा किलोमीटर फरपटत नेले त्यानंतर त्याला काढून बिबट्याने पळ काढला. मजूरांनी पाहिले असता त्या मुलाचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी  मोठी गर्दी केली. त्यानंतर घटनास्थळी वनविभागाचे  कर्मचारी दाखल झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी