MLC Election : राज्यसभेपाठोपाठ आता विधानपरिषद निवडणूकांचीही घोषणा, १० सीटांसाठी २० जूनला वोटिंग

maharashtra legislative council election | महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 20 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. 1० MLC चा कार्यकाळ 6 जुलै रोजी पूर्ण होणार आहे.

Following the Rajya Sabha, now the announcement of Legislative Council elections, voting for 10 seats on June 20
राज्यसभेपाठोपाठ आता विधानपरिषद निवडणूकांची घोषणा, १० सीटांसाठी २० जूनला वोटिंग ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देशातील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक
  • महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे.
  • विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता

मुंबई : देशातील सहा राज्यांमध्ये लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. पोटनिवडणुकीची अधिसूचना 30 मे रोजी जारी होणार असून मतमोजणी 26 जून रोजी होणार आहे. तर महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. २ जूनला अधिसूचना जाहीर होईल. ९ जूनपासून अर्ज दाखल करता येणार आहेत आणि २० जूनला मतदान होणार आहे. (Following the Rajya Sabha, now the announcement of Legislative Council elections, voting for 10 seats on June 20)

अधिक वाचा : 

Corona Cases in Maharashtra : राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या २१७५, बारा जिल्ह्यांतील रुग्णांची संख्या शुन्यावर

लोकसभेच्या तीनपैकी दोन जागा उत्तर प्रदेशातील आहेत. यापैकी आझमगडची जागा सपा नेते अखिलेश यादव आणि रामपूरची जागा मोहम्मद आझम खान यांनी विधानसभा निवडणुकीत जिंकल्याने रिक्त झाली होती. दुसरीकडे पंजाबमधील संगरूरची जागा आम आदमी पक्षाचे आमदार भगवंत मान यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सोडली होती. त्याच वेळी, सात विधानसभा जागांपैकी एक दिल्लीची राजेंद्र नगर जागा आहे, जी अलीकडेच आपचे राघव चड्ढा राज्यसभेवर गेल्यानंतर रिक्त झाली होती.


याशिवाय झारखंडमधील मंदार, आंध्र प्रदेशातील आत्मकूर आणि त्रिपुरातील आगरतळा, टाउन बोर्डोवाली, सूरमा आणि जुबराजनगर विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीमुळे राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या इलेक्टोरल कॉलेजच्या रिक्त जागा भरण्यास मदत होणार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जुलैमध्ये प्रस्तावित आहे.

अधिक वाचा : 

Micro Finance : अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई करा, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

या लोकसभा/विधानसभा जागांवर निवडणुका

पंजाब- संगरूर लोकसभा
उत्तर प्रदेश- रामपूर लोकसभा
उत्तर प्रदेश- आझमगड लोकसभा
त्रिपुरा- आगरतळा विधानसभा
त्रिपुरा- नगर बारडोली विधानसभा
त्रिपुरा- सुरमा विधानसभा
त्रिपुरा- जुबराजनगर विधानसभा
आंध्र प्रदेश- आत्मकूर विधानसभा
एनसीटी दिल्ली- राजिंदरनगर विधानसभा
झारखंड- मंदार विधानसभा

विधान परिषदेच्या निवडणुकाही जाहीर झाल्या

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारच्या विधान परिषदेच्या 30 जागांसाठीही निवडणुका जाहीर केल्या आहेत. या सर्व जागा 6 जून ते 21 जुलै दरम्यान रिक्त होत आहेत. या सर्व जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार असून त्याच दिवशी निकालही लागणार आहेत. आयोगाच्या म्हणण्यानुसार यूपीमध्ये १३, महाराष्ट्रातील १० आणि बिहारमधील सात जागांवर निवडणूक होणार आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेतील सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, प्रविण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड, दिवाकर रावते, रामनिवास सिंग या दहा विधान परिषद आमदारांचा कार्यकाळ संपतो आहे. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि मित्रपक्ष यांचं संख्याबळ 113 इतकं होत असल्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीतून शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही प्रत्येकी दोन आमदार विधान परिषदेत जातील. तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येईल. त्यानंतरही त्यांच्याकडे पहिल्या पसंतीची मतं शिल्लक राहत असून दुसऱ्या उमेदवारासाठी त्यांना 12 मतांची तजवीज करावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी