शरीर सुखाच्या हव्यापोटी सख्या भाऊ झाला पक्का वैरी, वहिनीवर एकतर्फी प्रेमाने भावाचा हत्या

jalgaon crime new : सख्या भावानेच भावाला संपल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भावाला अटक करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात ही घटना घडली. या प्रकरणी न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

For the sake of sex, the brother became a real enemy, killing his brother with one-sided love for his daughter-in-law
शरीर सुखाच्या हव्यापोटी सख्या भाऊ झाला पक्का वैरी, वहिनीवर एकतर्फी प्रेमाने भावाचा खून  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लहान भावाचा मोठ्या भावाच्या बायकोवर डोळा
  • एक तर्फी प्रेमातून मोठ्या भावाचा खून
  • खून प्रकरणी न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

जळगाव : पत्नीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भावाला शिवीगाळ केल्याने चिडून जावून सख्या भावाचा वखराच्या पासेने डोक्यात मारून खून केल्याचे प्रकरणातील आरोपी भावाला खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (For the sake of sex, the brother became a real enemy, killing his brother with one-sided love for his daughter-in-law)

जळगाव जामोद तालुक्यातील  सुनगाव येथील रमेश गणपत फुसे वय २६ व निलेश गणपत फुसे वय २२ हे संख्ये भाऊ असून निलेशला दारुचे व्यसन असल्यामुळे तो रमेश सोबत नेहमी वाद करीत असे तसेच मोठा भाऊ रमेशच्या पत्नीवर वाईट नजर ठेवत असे त्यामुळे रमेश आपली पत्नी अर्चना व मुलगी गायत्रीसह शेतात राहण्यास गेला होता. दरम्यान २८ एप्रिल २०१७ च्या रात्री निलेश हा दारुच्या नशेत शेतातील घरात गेला. तेथे रमेश व त्याची पत्नी झोपलेली होती. निलेशने आवाज देवून दरवाजा उघड सांगितले एवढेच नव्हे तर तो मला अर्चनासोबत झोपायचे आहे असे म्हणून आरडा ओरड करु लागला. त्यामुळे रमेशने शिवीगाळ करुन निलेशला शेतातून रात्रीच्या वेळेस काढून दिले. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास निलेश परत शेतात आला. त्यामुळे रमेश घराच्या ओसरीत झोपलेला होता. त्यामुळे सुध्दा निलेशने तुझ्या पत्नीसोबत झोपू का दिले नाही. यावरून वाद केला आणि वखराची पास रमेशच्या डोक्यावर मारली त्यामुळे रमेश गंभीर जखमी झाला. त्याला जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रमेशला मृत घोषीत केले.

याप्रकरणी रमेशच्या पत्नीने जळगाव जामोद पोस्टेला तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपी निलेश फुसे याच्या विरुध्द पोलिसांनी कलम ३०२, ५०४,५०६  भादंविचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. घटनेच्या तपासाअंती प्रकरण खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये प्रत्यक्ष दर्शी मृतकाची पत्नी व तिची मुलगी  यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यामुळे न्यायधीश श्रीमती वैरागड यांनी आरोपी निलेश फुसे याला कलम ३०२ मध्ये जन्मठेव व दहा हजार रुपये दंड आणि दंडाच्या रकमेतील ५ हजार रुपये फिर्यादी अर्चनाला देण्याचे निकाला नमूद केले आहे. तसेच कलम ५०४ मध्ये ६ महिने आणि कलम ५०६ मध्ये २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. उदय आपटे यांनी काम पाहिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी