Mumbai Crime News: कांदिवलीत गोळीबार, दोन तरूणांकडून चार राऊंड Firing, एकाचा मृत्यू; 3 जखमी

गावगाडा
Pooja Vichare
Updated Oct 01, 2022 | 09:00 IST

4 rounds Firing In Kandivali: बाईकवरून आलेल्या 2 जणांनी 4 राऊंड फायरिंग (Firing) केलं आहे. ज्यात एका तरुणाचा मृत्यू (one youth died) झाला, तर 3 तरुण (3 youths) जखमी झाले आहेत.

Four rounds of firing in Kandivali
दोन तरूणांकडून कांदिवलीत Firing 
थोडं पण कामाचं
  • हे प्रकरण शुक्रवारी रात्रीचे आहे.
  • मुंबईतील कांदिवली येथे बाईकवरून आलेल्या दोन तरुणांनी अचानक गोळीबार सुरू केला.
  • या गोळीबारात चार जणांना गोळी लागली.

मुंबई: An Incident of firing In Kandivali:  कांदिवलीत (kandivali)  गोळीबाराची घटना समोर आली आहे. येथे बाईकवरून आलेल्या 2 जणांनी 4 राऊंड फायरिंग (Firing) केलं आहे. ज्यात एका तरुणाचा मृत्यू (one youth died) झाला, तर 3 तरुण (3 youths) जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अंतर्गत वादातून 4 राऊंड गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण शुक्रवारी रात्रीचे आहे. मुंबईतील कांदिवली येथे बाईकवरून आलेल्या दोन तरुणांनी अचानक गोळीबार सुरू केला. या गोळीबारात चार जणांना गोळी लागली, त्यात एकाचा मृत्यू झाला. उर्वरित 3 जखमी तरुणांवर जवळच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा-  LPG Price: एलपीजी गॅस सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजची किंमत

या भागातील माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी गोळी झाडणारी व्यक्ती आणि घटनेतील पीडित व्यक्ती एकमेकांना ओळखत असल्याचं सांगितले. गोळीबाराच्या चार राऊंडमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव अंकित यादव असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनास दाभोळकर, मनीष गुप्ता आणि प्रकाश नारायण अशी उर्वरित तीन जखमींची नावे आहेत.

जुन्या वादातून ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी मुंबई पोलिसांचे डीसीपी विशाल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईकवरून आलेल्या तरूणांनी गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. दोन्ही आरोपींनी एकूण 4 राउंड फायरिंग केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मात्र, या घटनेमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. डीसीपी विशाल ठाकूर यांनी पुढे सांगितलं की, ही घटना रात्री 12.15 च्या दरम्यान घडली. या गोळीबाराच्या घटनेमागे नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे.

9 सप्टेंबर रोजी मुंबईतील वांद्रे भागातही गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. दरम्यान 2020 मध्येही अशीच एक घटना समोर आली होती. तेव्हा मुंबईत दोन गटात झालेल्या हाणामारीत 6 जण जखमी झाले होते. चेंबूरच्या मुकुंद नगर भागात हाणामारी झाली होती. दोन्ही गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. या घटनेत अनेक वाहनांच्या काचा फुटल्या होत्या.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी