अरे देवा! न्यायालयातून जामीन मिळवतानाही बनवाबनवी, नकली शुअर्टी पेपर बनवणारी टोळी पोलिसांच्या कचाट्यात

शासनाचे बनावट शिक्के असलेले रेशनिंग कार्ड, टॅक्स पावत्या, आधार कार्ड अशी कागदपत्रे वेगवेगळया न्यायालयात बनावट जामीनदार देण्याकामी स्वतःजवळ बाळगणार्‍या टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून बनावट रेशनिंग कार्डसह टॅक्स पावत्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Fraudulent gang involved in fabrication even after getting bail from court
अरे देवा! न्यायालयातून जामीन मिळवताही बनवाबनवी, नकली शुअर्टी पेपर बनवणारी टोळी पोलिसांच्या कचाट्यात ।  
थोडं पण कामाचं
  • बनावट कागदपत्रे देऊन कोर्टाची फसवणूक
  • बोगस जामिनासाठी कागदपत्रे आणि शिक्क्यांचा वापर
  • जिल्हा न्यायालयासमोर कारमध्ये सुरू होता गोरखधंधा

नागपूर : गुन्हेगारांना न्यायालयातून जामीन मिळण्याकरता बनावट कागदपत्रे वापरून "श्य़ोरिटी' बाँड तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शेकडो बनावट आधार कार्ड आणि रेशन कार्ड जप्त करण्यात आले आहेत. गेल्या 5 वर्षांपासून अशाच प्रकारे फसवणूक सुरू होती, न्याय व्यवस्थेला फसवण्याचे काम केले जात होते. (Fraudulent gang involved in fabrication even after getting bail from court)

अधिक वाचा :  National Herald Case: ED घेणार राहुल गांधींची शाळा, १३ जूनला हजर होण्याचे समन्स

 गुन्हेगारांना न्यायालयातून जामीन  मिळण्याकरता "जामीन" बाँड तयार करावा लागतो, अनेकदा गुन्हेगारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता कोणतीही व्यक्ती त्यांची कागदपत्रे ‘जामीन’ तयार करून देत नाहीत, अशा परिस्थितीत गुन्हेगारांकडून हजारो रुपये वसूल करण्यासाठी, आधारकार्ड, रेशनकार्ड, बनावट ओळखपत्र बनवून ही मंडळी बनावट कागदपत्रे देतात.  या बनावट कागदपत्राच्या आधारे जामीनदार तयार करून न्यायालयात सादर केले जातात त्यानतर गुन्हेगारांना जामीन मिळतो. 

अधिक वाचा :  महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक होणार, सात उमेदवार रिंगणात

 या टोळीचे अवैध धंदे सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्याने जिल्हा न्यायालयासमोर चार चाकी वाहनातून बनावट कागदपत्रांवरून ‘जामीन’ तयार करण्याचे रॅकेट सुरू होते.  पोलिसांनी छापा टाकून सुनील सोनकुसरे आणि सतीश साहू नावाच्या दोन आरोपींना अटक केली असून, अडीचशे हून अधिक बनावट आधार कार्ड, 107 बनावट रेशनकार्ड, प्रमाणपत्र, 1000 हून अधिक पासपोर्ट फोटो, लॅपटॉप प्रिंटर झेरॉक्स मशीन आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी