मुंबई: राज्यातील विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना निधीचे बळ देण्यात आले आहे. एकूण 13 हजार 539 कोटी रुपयांची तरतूद 2023-24 च्या अर्थसंकल्पात( budget) करण्यात आली आहे. यातील 10 हजार 600 कोटी रुपये मध्य रेल्वेला देण्यात आले आहेत. तर उर्वरित निधी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (Mumbai Railway Development Corporation ) मुंबईतील प्रकल्प आणि अन्य विभागांसाठी प्रस्तावित आहे. अमृत योजनेंतर्गत राज्यातील रेल्वे मार्गांचा विकास केला जाणार आहे. (funds for railway projects of state; 13 thousand crore funds in the budget)
अधिक वाचा : चेहऱ्याचा ग्लो वाढवेल मोहरीचं तेल
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या स्थापनेपासून मुंबई शहरी परिवहन प्रकल्पासाठी (एमयूटीपी) आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 1 हजार 101 कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर होईल. मुंबई, ठाण्यासह, कर्जत, कसारा, मिरा रोड, विरार-डहाणू आणि पनवेलपर्यंत पसरलेल्या महानगरातील रेल्वे प्रकल्पांचा समावेश एमयूटीपी प्रकल्पात होतो. या प्रकल्पांसाठी केंद्राइतकाच निधी राज्य सरकारकडून पुरवला जातो. यामुळे यंदा एमयूटीपी प्रकल्पांसाठी केंद्र-राज्य मिळून एकूण 2202 कोटी इतका निधी उपलब्ध होणार आहे, असल्याचं एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाषचंद गुप्ता यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला पूर्णत: नव्या मार्गिकांच्या कामांसाठी एकूण 1 हजार 685 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, सर्वाधिक 600 कोटी रुपयांची तरतूद वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ पुसद या 270 किलोमीटर मार्गिकेसाठी आहे. तर अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ मार्गिकेसाठीही 250 कोटी, सोलापूर-उस्मानाबाद-तुळजापूर मार्गासाठी 110 कोटी आणि धुळे-नर्दाना मार्गिका, कल्याण-मुरबाड व्हाया उल्हासनगर आणि बारामती-लोणांद मार्गासाठी प्रत्येकी 100 कोटी रुपयांची, तर फलटण-पंढरपूर या 105 किलोमीटर मार्गिकेच्या बांधकामासाठीही 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
अधिक वाचा : Chanakya Niti डोक्यात ठेवली तर कधीच नाही बिघडणार आपला बजेट
राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या अतिरिक्त मार्गिकांच्या कामांसाठी एकूण 2 हजार 702 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. यापैकी कल्याण –कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी 90 कोटी, पुणे – मिरज – लोंडा दोन मार्गिकांसाठी ९00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर वर्धा –नागूपर तिसरा मार्ग, वर्धा – बल्लारशहा तिसरा मार्ग, इटारसी – नागपूर, दौंड – मनमाड दोन मार्गिका, वर्धा – नागपूर चौथी मार्गिका, मनमाड – जळगाव तिसरा आणि जळगाव – भुसावळ चौथ्या मार्गिकेच्या कामांसाठीही निधी दिला जाणार आहे.
मुंबई शहरी परिवहन प्रकल्पासाठी (एमयूटीपी) आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 1 हजार 101 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर होण्यास मदत होईल. महानगरातील रेल्वे प्रकल्पांसाठी निधी देण्यात आला आहे.
अधिक वाचा : Daily Horoscope : सिंह राशीला लाभेल प्रेम तर तुळ राशीला असेल चिंता
पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय 28 किमीची दुहेरी मार्गिका, ऐरोली-कळवा उन्नत मार्गिका, विरार-डहाणू चौपदरीकरण या मुख्य प्रकल्पांचा समावेश असलेल्या एमयूटीपी-3 प्रकल्पसंचासाठी सर्वाधिक 650 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 238 वातानुकूलित लोकलसह लोकल आणि मेल-एक्स्प्रेस यांची स्वतंत्र मार्गिका उभारण्यासाठी कल्याण यार्ड नूतनीकरणाचा समावेश यात आहे.
हार्बर मार्गिकेचा बोरिवलीपर्यंत विस्तार, कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण-बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका आणि उपनगरीय रेल्वे स्थानक सुधारणा या प्रकल्पांचा समावेश आहे. एमयूटीपी-2 प्रकल्पसंचात सीएसएमटी-कुर्ला पाचवी सहावी मार्गिका आणि मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी मार्गिका उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पसंचासाठी एकूण 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.