Maharashtra Politics: गजानन कीर्तिकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर मुलगा अमोल कीर्तिकरांनी घेतला मोठा निर्णय

गावगाडा
Pooja Vichare
Updated Nov 12, 2022 | 10:34 IST

Gajanan Kirtikar News: गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे. गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली आहे.

Gajanan Kirtikar News
शिंदे गटात गजानन कीर्तिकरांचा प्रवेश, मुलानंही घेतला मोठा निर्णय 
थोडं पण कामाचं
 • गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे.
 • गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली आहे.
 • कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त

मुंबई:  Maharashtra Politics News: शिवसेनेचे खासदार आणि जुने जाणते नेते असलेले गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar)  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)  यांच्या गटात प्रवेश केला आहे. गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांची साथ सोडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

गजानन कीर्तिकर यांची बाळासाहेब ठाकरे यांचे जुने म्हणून ओळख आहे. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं ठाकरे गटातील खासदारांची संख्या ही कमी झाली आहे. पण अमोल कीर्तिकर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे गटात अमोल कीर्तिकर हे उपनेते या पदावर आहेत. 

अधिक वाचा- शिंदे- फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्पातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच 

काय म्हणाले अमोल कीर्तिकर

शिंदे गटात जाण्याचा वडिलांचा वैयक्तिक निर्णय आहे. वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नसल्याचं अमोल कीर्तीकर यांनी सांगितलं. मी मात्र शेवटपर्यंत आदित्य ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचं अमोल कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं आहे. 

गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत

गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. यानंतर खासदार किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम मुंबईत रवींद्र नाट्यमंदिर येथे झाला.  

खासदार गजानन किर्तीकर यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या लोकसभेतील खासदारांची संख्या 13 झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे लोकसभेत 6 आणि राज्यसभेत 3 असे 9 खासदार उरले आहेत. 

गजानन किर्तीकर यांची राजकीय कारकिर्द

 1. 1990, 1995, 1999, 2004 - विधानसभा निवडणुकीत विजय, 4 टर्म मालाड मतदारसंघातून आमदार झालेले नेते
 2. 2014 आणि 2019 - लोकसभा निवडणुकीत विजय
 3. 1995 ते 1998 - महाराष्ट्र शासनाचे गृहराज्यमंत्री, पर्यटन खात्याचे राज्यमंत्री
 4. 1998 ते 1999 - महाराष्ट्र शासनाचे माहिती, जनसंपर्क, वाहतूक या खात्यांचे कॅबिनेट मंत्री.  
 5. 2006 - स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष
 6. 2007 पासून - शिवसेना नेते
 7. 2010 - मुंबई उपनगर कबड्डी परिषदेचे अध्यक्ष
 8. गजानन किर्तीकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुरुदास कामत यांचा 1 लाख 83 हजार मतांनी केला पराभव

शिंदे गटात सामील झाले 13 खासदार

 • राहुल शेवाळे 
 • भावना गवळी 
 • कृपाल तुमने 
 • हेमंत गोडसे 
 • सदाशिव लोखंडे 
 • प्रतापराव जाधव  
 • धैर्यशिल माने 
 • श्रीकांत शिंदे 
 • हेमंत पाटील 
 • राजेंद्र गावित 
 • संजय मंडलिक 
 • श्रीरंग बारणे 
 • गजानन किर्तिकर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी