Thane Crime News: सोशल मीडियाची मैत्री पडली भारी, दोरीनं बांधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 29, 2022 | 08:06 IST

Crime News: भिवंडीत (Bhiwandi) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर (minor girl) सामूहिक लैंगिक (gang rape) अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Gang Rape
भिवंडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार 
थोडं पण कामाचं
  • भिवंडीतल्या काल्हेर भागात ही घटना घडली आहे.
  • एका अल्पवयीन मुलीवर (minor girl) सामूहिक लैंगिक (gang rape) अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
  • या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.

ठाणे: A case of gang rape of a minor girl: भिवंडीत (Bhiwandi)  एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर (minor girl)  सामूहिक लैंगिक  (gang rape) अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भिवंडीतल्या काल्हेर भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. (Gang rape of minor girl Bhiwandi Three people were arrested crime news marathi)

16 वर्षीय एका मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. शनिवारी रात्री उशीरा पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. चितळसर पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं तीन जणांना ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. चितळसर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर हे प्रकरण नारपोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं. 

अधिक वाचा-  Twin Towers पाडल्यामुळे आमचे 500 कोटी रुपयांचे नुकसान, Supertech च्या बिल्डर बिल्डरच्या डोळ्यात आश्रू

आरोपी वागळे इस्टेट भागातले 

अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी हे वागळे इस्टेट भागातले रहिवाशी आहेत. यातल्या एका आरोपीची दीड वर्षांपूर्वी पीडित मुलीसोबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इस्टाग्रामवर ओळख झाली होती.

दोरीनं बांधून लैंगिक अत्याचार 

शुक्रवारी दुपारी या तरूणानं पीडित मुलीला भिवंडीतल्या काल्हेर भागात त्याच्या मित्राच्या घरी नेलं. त्या मित्राचं घर बंद होते. त्यानंतर त्या घरात आणखी दोघं जण आले. या तिघांनीही पीडित मुलीला दोरीच्या साहाय्यानं बांधलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या पीडितेला मारहाण ही करण्यात आली आहे. तसंच याप्रकाराबद्दल कोणालाही कुठे सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. 

घरी आल्यावर समजला घडलेला प्रकार 

पीडित मुलगी घरी आली. त्यानंतर तिनं आपल्या घराच्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पीडितेनं या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर चितळसर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

गुन्हा दाखल होताच चितळसर पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखा युनिट पाचच्या पथकानं तिघांना वागळे इस्टेट येथून ताब्यात घेतलं. दरम्यान ही घटना भिवंडीत घडल्यानं हे प्रकरण चितळसर पोलीस ठाणे येथून नारपोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणातील तिन्ही आरोपींचा ताबा नारपोली पोलिसांकडे देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी