Good News... राज्य सेवा आयोगाचा मोठा निर्णय, आता कितीही वेळा द्या MPSC परीक्षा

MPSC Exam attempt limit : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Good news for the examinees ... MPSC's maximum opportunity limit canceled, exams can be given as many times as per age limit
Good News... राज्य सेवा आयोगाचा मोठा निर्णय, आता कितीही वेळा द्या MPSC परीक्षा ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एमपीएससीने उमेदवारांच्या कमाल संधीबाबत फेरबदल केले
  • उमेदवारांच्या कमाल संधीची मर्यादा रद्द करण्यात आली.
  • आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देता येणार आहे.

मुंबई: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने आज मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाच्यावतीने आता परीक्षा देण्यासाठी कमाल संधीची अट राहणार नाही. कमाल संधीची मर्यादा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आला. त्यामुळे परीक्षार्थींना पूर्वीप्रमाणेच निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. (Good news for the examinees ... MPSC's maximum opportunity limit canceled, exams can be given as many times as per age limit)

अधिक वाचा : 

स्कूल चले हम! शाळेचा पहिला दिवस बनवला असा विस्मरणीय, विद्यार्थ्यांची उंडावरुन सवारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना त्यांना ठरवून देण्यात आलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा एमपीएससीच्या वेगवगेळ्या परीक्षा देता येणार आहेत.

अधिक वाचा : 

Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १९२६१ कोरोना Active, आज ४०२४ रुग्ण, २ मृत्यू


एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा आणण्यासाठी काही फेरबदल करण्यात येत आहेत. यूपीएससीच्या धरतीवर एमपीएससीनेही परीक्षा देण्यासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित केली होती. त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी सहा वेळा संधी, इतर मागासवर्गीयांसाठी नऊ वेळा संधी असा नियम मर्यादित करण्यात आली होता. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी कमाल संधी मर्यादा नव्हती. आता आयोगाने हा निर्णय मागे घेतला असून पूर्वीप्रमाणेच परीक्षार्थींना संधी देण्यात आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी