Gopinath Munde Birth Anniversary: गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन, पाहा WhatsApp, Facebook post 

Gopinath Munde Birth Anniversary: गोपीनाथ मुंडे यांची 12 डिसेंबर रोजी जयंती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनमित्त त्यांच्या समर्थकांकडून स्मृतींना अभिवादन करणारे फोटोज सोशल मीडियात शेअर करण्यात येत आहेत.

Gopinath Munde Birth Anniversary 2022 marathi wishes share on facebook whatsapp see photos
Gopinath Munde Birth Anniversary: गोपीनाथ मुंडे यांची जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन, पाहा WhatsApp, Facebook post   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • गोपीनाथ मुंडे यांची सोमवारी (12 डिसेंबर 2022) जयंती
  • गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणारे मेसेज, फोटोज सोशल मीडियात व्हायरल होत आहेत

Gopinath Munde birth anniversary messages: लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 12 डिसेंबर रोजी जन्म दिवस... त्यांच्या पश्चात त्यांचा वाढदिवस हा जयंती म्हणून साजरा केला जातो. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा लाखोंचा जनसमुदाय त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गोपीनाथ गडावर येत असतो. स्व गोपीनाथ मुंडे याना अभिवादन करण्यासोबतच मुंडे समर्थकांकडून गोपीनाथ मुंडे यांची जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणारे मेसेजेस, फोटोज सोशल मीडियात शेअर करण्यात येत आहेत. सोशल मीडियात शेअर करण्यात येणारे असेच काही मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Gopinath Munde Birth Anniversary 2022 marathi wishes share on facebook whatsapp see photos)

(Photo: Twitter)

पंकजा मुंडे यांचे गोपीनाथ मुंडे प्रेमींना 12 डिसेंबर निमित्त आवाहन

12 रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिन हा दिवस बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात असणाऱ्या  पांगरी या गावी गोपीनाथ गड या ठिकाणी त्यांना अंत्यसंस्कार करूम त्या ठीकानी स्मारक उभारण्यात आले आहे याच ठिकाणाला गोपीनाथ गड असे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा वाढदिवस हा जयंती म्हणून साजरा केला जातो मात्र सध्या ग्रामपंचायतच्या निवडणूक लागल्या असून सध्या जिल्ह्यात आचार संहिता सुरू आहेत.

मात्र गोपीनाथ मुंडे यांना मानणारा लाखोंचा जनसमुदाय त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गोपीनाथ गडावर येत असतो. यंदा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते व आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या वरिस्ट कन्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वर नुकतीच व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि या व्हिडिओमध्ये पंकजा मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या तमाम जनतेला एक आवाहन केले आहे.

(Photo: Twitter)

पंकजा मुंडे म्हणाल्या, यंदा 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यास येण्याऐवजी त्यांनी त्यांच्या ठिकाणीच गोपीनाथ गड समजून समाज उपयोगी कार्य करावे, गरजूंना मदत करावी आणि यातूनच लाडक्या नेत्यांना खरी आदरांजली असेल.

(Photo: Sharechat)

12 डिसेंबर रोज पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर 11 वाजता उपस्थित राहणार आहे. तेथे 30 मिनिटं पंकजा मुंडे मौन पाळणार आहेत तर इतरांनीही असेच 30 मिनटं त्यांच्यासोबत मौन पळून महाराष्ट्रात होत असलेल्या अप्रिय घटनाच्या विरोधात प्राथमिक स्वरूपाची तिलांजली देण्यासाठी असणार असे पंकजा मुंडे यांनी आवाहन केले आहे.

(Photo: Instagram)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी