Governor Ramesh Bais presents Hon. D.Litt. on Chief Minister Eknath Shinde : डी. वाय. पाटील विद्यापीठाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.लिट. (डॉक्टर ऑफ लेटर्स) ही मानद पदवी (मानाची पदवी) देण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना मानाची पदवी देण्यात आली. विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात मुख्यमंत्र्यांना मानद पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यााठी मुख्यमंत्र्यांना मानद पदवी देण्यात आली.
याआधी डी. वाय. पाटील विद्यापीठाने डॉ. रघुनाथ माशेलकर, आप्पासाहेब धर्माधिकारी, सुनील गावस्कर, ब्रायन लारा, नारायण मूर्ती या दिग्गजांना मानद डी.लिट. दिली आहे. या यादीत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश झाला आहे. हा आपल्यासाठी बहुमान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. डॉ डी वाय पाटील हे शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ असून त्यांनी शिक्षण एका ठराविक साचातून बाहेर काढले असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या पद्धतीने सार्वजनिक जीवनात कार्य केले. आजही कार्यकर्ता आहोत आणि यापुढेही कार्यकर्ता राहू असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यांच्यासाठी सर्वसमावेशक काम केले. यामुळे आपले नाव श्रीमंतांच्या यादीत येणार नाही पण माणुसकीच्या यादीत निश्चित येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात 2452 जणांना पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच. डी, सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. लोकमत समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांना राज्यपालांच्या हस्ते माध्यम क्षेत्र, राजकीय योगदान व दातृत्वासाठी डी.लिट ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
प्राचीन काळात भारत जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र होते व सातव्या शतकापर्यंत जगभरातील लोक भारतात अध्ययनासाठी येत. देशात नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला सारखी ख्यातकीर्त विद्यापीठे होती. राज्यातील विद्यापीठे तसेच उच्च शैक्षणिक संस्थांनी हे आपले शिक्षणातील गतवैभव पुनश्च प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यापीठे व शिक्षण संस्थांना केले. ते डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सतराव्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते. दीक्षांत सोहळा विद्यापीठाच्या नेरुळ येथील शैक्षणिक संकुलात झाला. आतापर्यंतच्या कार्यासाठी राज्यपालांनी विद्यापीठाचे कौतुक केले. तसेच पदवीधरांना राष्ट्रकार्यात योगदान देण्याचे आवाहन केले.
IPL ट्रॉफीवर संस्कृतमध्ये काय लिहिले आहे?
IPL 2023 मध्ये नाही खेळणार हे खेळाडू
IPL मधून चमकलेले भारतीय क्रिकेटपटू