Nashik Crime: जीव की प्राण असलेल्या नातवानेच संपवलं आजीला, हातातल्या कड्यानं डोळ्यावर केले घाव; आजी जागीच ठार

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 24, 2022 | 11:59 IST

Nashik Murder Case: एका नातवानेच (Grandson) आपल्या आजीची (Grandmother) हत्या केली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Nashik Murder Case
नाशिकमध्ये नातवानेच केली आजीची हत्या 
थोडं पण कामाचं
  • नाशिक जिल्ह्यात (Nashik District) मन सुन्न करणारी घटना घडली आहे.
  • या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
  • नाशिक जिल्ह्यातल्या हरसूलमध्ये (Harsool crime News)आजी आणि नातू या नात्यालाच काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली.

नाशिक: Nashik Grandson Murdered Grandmother:  गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी आहे. या बातमीनं सर्वांनाच हादरा बसला आहे. नाशिक जिल्ह्यात (Nashik District)  मन सुन्न करणारी घटना घडली आहे. जिल्ह्यात एका नातवानेच (Grandson) आपल्या आजीची (Grandmother) हत्या केली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Nashik Murder Case)

नाशिक जिल्ह्यातल्या हरसूलमध्ये (Harsool crime News)आजी आणि नातू या नात्यालाच काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली. क्षुल्लक कारणावरून आजी आणि नातवामध्ये भांडण झालं. याचाच राग मनात ठेवून त्यानं रागाच्या भरात हातातील कड्यानेच वार केले. नातवाने आजीच्या उजव्या डोळ्याजवळ वार केले. यात आजी गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी नातवाला ताब्यात घेतलं आहे. 

अधिक वाचा-  Amitabh Bachchan: बिग बींनी 11.25 मि. केलं महत्त्वाचं Tweet, दिली स्वतःची Health Update

मिळालेल्या माहितीनुसार, गंगुबाई रामा गुरव असे मृत आजीचं नाव आहे. या घटनेनंतर परिसरात तसंच जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या हत्येचा अधिक तपास करत आहेत. मृत आजीचं वय 70 होतं. तर गंगुबाई यांच्या नातवाचं नाव दशरथ गुरव असं आहे. दशरथ यानं मंगळवारी सकाळी हातातल्या कड्यानं वार करत आजीचा जीव घेतला आहे. 

पोलिसांनी दिली घटनेची माहिती 

आजीच्या हत्येनंतर घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  हरसूल पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जनार्धन झिरवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार,  हरसूल शहरातील इंदिरा नगर येथे मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गंगुबाई उजव्या डोळ्याजवळ दशरथ याने हातात घातलेल्या कड्याच्या सहाय्याने वार केलं. आजीवर केलेला हल्ला इतका भयंकर होता की गंगुबाई यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

गंगुबाई गुरव यांचा मृतदेह हरसूल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सुध्या पोलिसांना पुढील तपास करण्यासाठी शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. अहवाल आल्यानंतर पोलीस पुढील तपास सुरू करतील. आरोपी नातवाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी