भारताला पाच वर्षानंतर पेट्रोलची गरज भासणार नाही : गडकरी

green fuel will end the need for the use of petrol in vehicles in the country after five years says nitin gadkari : सीएनजी आणि बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांमुळे भारताला पाच वर्षानंतर पेट्रोलची गरज भासणार नाही, असा विश्वास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

green fuel will end the need for the use of petrol in vehicles in the country after five years says nitin gadkari
भारताला पाच वर्षानंतर पेट्रोलची गरज भासणार नाही : गडकरी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारताला पाच वर्षानंतर पेट्रोलची गरज भासणार नाही : गडकरी
  • पर्यावरणपूरक इंधन पर्यायांची मागणी वाढेल
  • शेतकऱ्यांनी पोटाची भूक भागवतानाच ऊर्जेची भूक भागविण्यास मदत केली तर त्यांचा आर्थिक लाभ होईल आणि देशाच्या विकासाला गती येईल

green fuel will end the need for the use of petrol in vehicles in the country after five years says nitin gadkari : सीएनजी आणि बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांमुळे भारताला पाच वर्षानंतर पेट्रोलची गरज भासणार नाही, असा विश्वास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ते महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलत होते. देशमुख कृषी विद्यापीठाने गडकरींना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी दिली. ही पदवी स्वीकारल्यानंतर सत्कार समारंभाला उत्तर देताना गडकरींनी देशातील पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वेगाने वाढत असल्याचे सांगितले. 

इथेनॉल मिश्रीत परंपरागत इंधन, सीएनजी आणि बॅटरी यापैकी एखादा पर्याय वापरून वाहने चालविणाऱ्यांची संख्या भारतात वेगाने वाढत आहे. येणाऱ्या काळात देशात सीएनजी आणि बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढेल. इतर पर्याय हळू हळू मागे पडतील. आर्थिकदृष्ट्या परवडणारे म्हणून पर्यावरणपूरक इंधन पर्यायांची मागणी वाढेल. भारताला पाच वर्षानंतर पेट्रोलची गरज भासणार नाही; असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले.

भारत सरकार तसेच देशातील अनेक राज्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना आखण्यास आणि अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे. वाहनांची बॅटरी चार्ज करणाऱ्या चार्जिंग स्टेशनमध्ये वेगाने वाढ होत आहे. आज महाग वाटणारी पर्यावरणपूरक वाहने सरकारच्या धोरणांमुळे पुढील पाच वर्षांत अनेकांना परवडतील. मागणीत वाढ होईल आणि निर्मिती खर्चात घट होईल. पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी केंद्र सरकार राज्यांच्या तसेच अनेक सरकारी आणि खासगी आस्थापनांच्या सहकार्याने धोरणात्मक निर्णय घेऊन अंमलात आणत आहे. याचे सकारात्मक परिणाम पाच वर्षांत दिसतील, असे गडकरी म्हणाले. 

भारताच्या कृषी विकासाचा दर पाच वर्षांत २० टक्के व्हावा यासाठी कृषी क्षेत्रातील संशोधकांनी काम करावे, असे आवाहन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले. देशाची मागणी ओळखून शेती केली, एकाच जमिनीवरून एकपेक्षा जास्त प्रकारच्या पिकांचे उत्पादन काढले, शेती आणि शेतीला पूरक असे आधुनिक व्यवसाय यावर नियोजन करून काम सुरू केले तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील; असे नितीन गडकरी म्हणाले.

शेतकऱ्यांनी पोटाची भूक भागवतानाच ऊर्जेची भूक भागविण्यास मदत केली तर त्यांचा आर्थिक लाभ होईल आणि देशाच्या विकासाला गती येईल. संशोधकांनी या दृष्टीने शेतीक्षेत्रात संशोधन करणे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे; असेही नितीन गडकरी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी