सुकेशनी नाईकवाडे, बीड
महाराष्ट्राच्या राजकारणात एकानंतर एक सूचक घडामोडी घडत असतानाच मराठवाड्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची घटना घडली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा पडला आहे. गुरुवार (13 एप्रिल 2023) सकाळी 10 वाजेपासून GST चे अधिकारी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात पोहोचले. जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून येथील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा : ...म्हणून विवाहबाह्य संबंध जास्त काळ टिकतात
केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्या प्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच GST विभागाकडून ही कारवाई होत असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
हे पण वाचा : गर्लफ्रेंडसमोर चुकूनही बोलू नका या 9 गोष्टी
भाजपविरोधी नेत्यांवरच केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होते, त्यांच्याच चौकशा होतात, असा आरोप विरोधी पक्षांकडून नेहमी करण्यात येतो. आता स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्याच साखर कारखान्यावर छापेमारी झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. भाजपचे दिग्गज नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र नेमकी कोणत्या कोणत्या बाबी समोर येणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागले आहे.
हे पण वाचा : ...म्हणून काही मुलींना बॉयफ्रेंड मिळत नाही
जीएसटी विभागाने केलेल्या छापेमारीनंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, वैद्यनाथ कारखान्यावर झालेली जीएसटीची कारवाई मला अचबित करणारी आहे. मीडियाला आणि मला एकाच वेळी माहिती मिळते हे मला आश्चर्य करणारे आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासारखेच परिस्थिती राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांची आहे. तर साखर कारखाना बंद होता त्यामुळे बऱ्याच गोष्टी या साखर कारखान्याबाबतीत वाईट परिस्थितीत आहेत. अशाही परिस्थितीमध्ये अचानक जीएसटीचे अधिकारी हे साखर कारखान्यावर आले, त्यांचे अचानक येणं मलाही अचंबित करणार आहे.