आनंदाची गुढी !, गिरगाव, डोंबिवली, पुणे आणि नागपूरमध्ये उत्साहात शोभायात्रा, पाहा Video

Gudi Padwa 2023 : गिरगाव, ठाणे, डोंबिवली, पुणे आणि नागपूरमध्ये गुढीपाडवा मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. ठाण्यातील शोभा यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर नागपूरमधील शोभा यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आहेत.

आनंदाची गुढी !, गिरगाव, डोंबिवली, पुणे आणि नागपूरमध्ये उत्साहात शोभायात्रा, पाहा Video
Gudi Padwa is welcomed with joy in the whole state, processions are held everywhere  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुढी पाडवा उत्साहात साजरा केला.
  • घरोघरी पारंपारिक पद्धतीने गुढी उभारल्या
  • भगव्या जल्लोषात शोभायात्रा

मुंबई : हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणजे गुढीपाडवा. आज गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढी उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर गुडीपाडव्याला मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्याची आपली शतकांची परंपरा आहे. सकाळपासूनच गिरगाव, ठाणे, डोंबिवली, पुणे आणि नागपूर आदी शहरांमध्ये पारंपारिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, मातीतील कसरती यांची ओळख करुन देणाऱ्या शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. (Gudi Padwa  is welcomed with joy in the whole state, processions are held everywhere)

अधिक वाचा : ऑस्ट्रेलिया रोखणार भारताचा विजय रथ?

सकाळी सकाळीच घरावर गुढ्या उभारून मोठ्या उत्साहात गुढी पाडवा साजरा करण्यात आला.गुडीपाडव्याला मुंबईकर गिरगावमधील शोभायात्रेत जमले. ढोला ताशाच्या गजरामध्ये आकर्षक रांगोळ्यांनी गिरगावमध्ये गुढीपाडवा शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला जात आहे. दरवर्षी स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे गिरगावमध्ये गुढीपाडव्याचं आयोजन केलं जातं.

गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा सकाळी सकाळी 7 वाजता कोपिनेश्वर मंदिर, तलावपाळी येथून शोभा यात्रा निघाली. या यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. या यात्रेत पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशा पथक, लेझीमच्या तालावर मिरवणुका काढत तरुणाईने आनंदाला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं होतं. प्रत्येकजण एकमेकांना अलिंगण देत शुभेच्छा देताना दिसत होता.

अधिक वाचा : पाडव्या पूर्वीच सोने-चांदीच्या भाव वाढीची गुढी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारून गुढी पाडवा साजरा केला. यावेळी फडणवीस हेही नागपूरमधील शोभात यात्रेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी पारंपारिक पोषाख परिधान केला होता. शोभा यात्रेत नागपूरकरांनी फुगड्यांचा फेर धरला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी