गुणरत्न सदावर्तेंच्या महाराष्ट्र दर्शनला ब्रेक, अखेर १८ दिवसानंतर आर्थर रोड तुरुंगातून सुटका

gunratna sadavarte : एसटी कामगारांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांची अखेर अर्थररोड जेलमधून सुटका झाली आहे. सदावर्ते गेल्या 18 दिवसांपासून कोठडीत होते.

Gunaratna Sadavarten released from Arthur Road Jail after 14 days
गुणरत्न सदावर्तेंच महाराष्ट्र दर्शनला ब्रेक, अखेर १४ दिवसानंतर आर्थर रोड तुरुंगातून सुटका ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अखेर गुणरत्न सदावर्ते सुटका झाली आहे.
  • सदावर्तेंची जेलमधून सुटका होताच राज्य सरकारवर हल्ला
  • आपण भ्रष्टाचाराविरोधात लढा देणार असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी कामगारांनी हल्ला केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या वकिल गुणरत्न सदावर्ते यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. सदावर्ते यांची १८ दिवसांनी सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर येताच सदावर्ते यांनी जोरदार घोषणा दिल्या. तसेच हा लढा सुरूच राहणार असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. (Gunaratna Sadavarten released from Arthur Road Jail after 18 days)

अधिक वाचा : 

Scholarship : विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्कासाठी मिळणार शिष्यवृत्ती, या वेबसाईटवर करा अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी कामगारांनी हल्ला केल्यानंतर सदावर्ते आणि एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सदावर्ते यांच्यावर राज्यभर गुन्हे दाखल झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदावर्ते यांचे महाराष्ट्र दर्शन सुरू झाले. पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, अकोला, सोलापूर येथे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, पुणे पोलीस सदावर्ते यांना अटक करणार होते. मात्र, न्यायालयाने त्यांना अटकेतून दिलासा दिला. न्यायालयाने सदावर्ते यांना २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

अधिक वाचा : 

MHADA: म्हाडाच्या २८०० सदनिका आणि २२० भुखंडाच्या विक्रीसाठी सोडत, ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सदावर्ते सध्या आर्थर रोड कारागृहात होते ते उपोषणाला बसले होते. सदावर्ते गेल्या १५ दिवसांपासून काहीच खात नाहीत. सदावर्ते ज्या पोलीस ठाण्यात होते, तेथे पोलीस त्यांना जेवणाची विनंती करत होते. मात्र, सदावर्तने खाण्यास नकार देत सकाळ-संध्याकाळ फक्त रस प्यायल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सदावर्ते यांच्यावर राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत गावदेवी, सातारा, कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तनला ताब्यात घेतले होते. 

अधिक वाचा : 

Sanjay Raut : टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत, संजय राऊत यांची किरीट सोमय्यांवर टीका

आज सदावर्तेंची जेलमधून सुटका होताच त्यांनी आक्रमकपणे माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. यापुढे आपण भ्रष्टाचाराविरोधात लढा देणार, असं सदावर्ते म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी