Beed : घरावर तिरंगा लावण्यासाठी चढला अन्... शाॅक लागल्याने तरुण जागीच ठार

देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना बीड जिल्ह्यात एक दुखद घटना घडली. हर घऱ तिरंगा अभियानांतर्गत घरावर झेंडा लावत असताना विजेचा धक्का बसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला.

He climbed up to put the tricolor on the house and... due to the shock, the young man died on the spot
Beed : घरावर तिरंगा तिरंगा लावण्यासाठी चढला अन्... शाॅक लागल्याने तरुण जागीच ठार  |  फोटो सौजन्य: Times Now

बीड : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी 'हर घर तिरंगा' लावण्याचा उपक्रम मोठ्या दिमाखात सुरू आहे. हर घर तिरंगा अभियानाने प्रेरित होऊन केज  तालुक्यातील वरपगाव येथे दुर्दैवी घटना घडली आहे. यावेळी ३० वर्षीय तरुण घरावर तिरंगा झेडा लावण्यासाठी चढला असता विजेचा धक्का लागला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना दुर्दैवी घटना घडल्याने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (He climbed up to put the tricolor on the house and... due to the shock, the young man died on the spot)

अधिक वाचा : ....त्यांची 'बावन' असतील ना एकशे बावन्न, कितीही 'कुळं' उतरली तरी शिवसेना संपणार नाही; उद्धव ठाकरेंचे भाजपला फटकारे

देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षा निमित्ताने देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानास देशभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी बीड जिल्ह्यातील वरपगावमधील शेखर मुख्तार (वय ३०) हा आपल्या स्वतःच्या घरावर राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी चढला होता. त्यावेळी त्याच्या हातामध्ये असलेला स्टीलचा पाईप विद्युत तारेला लागल्याने जोरात विजेचा धक्का बसला. त्यामुळे तो वरुन खाली फेकला गेला.

अधिक वाचा : Tiranga Yatra: बीडमध्ये भाजपच्या तिरंगा यात्रेत उर्दू शाळेच्या विद्यार्थीनींचा सहभाग, VIDEO

मुख्तार याने सकाळीच घरावर राष्ट्रीय ध्वज लावला होता. परंतु हवेने पाईप वाकल्याने ती व्यवस्थित करण्यासाठी घराच्या गच्चीवर चढून तो व्यवस्थितरित्या लावताना जवळून गेलेल्या विद्युत तारेला झेंड्याचा पाईप चिटकला व विजेचा धक्का लागून शेख मुख्तार हा फेकला गेला.  दरम्यान घटना घडताच तातडीने त्याला केज येथे दवाखान्यात घेऊन आले असता तपासणी करुन डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी