Crime news : 'नो पार्किंग'मधली गाडी उचलली, म्हणून तो गन घेऊन पोहचला पोलीस ठाण्यात

गावगाडा
Updated Nov 22, 2021 | 18:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

सातारा वाहतूक पोलिसांच्या शाखेत दोन तरुन पिस्तुल घेऊन घुसले होते. पोलिसांनी त्यांच्यावर झडप टाकून त्यांच्या पिस्तुल ताब्यात घेतली आहे.

He picked up the car from 'No Parking', so he took the gun to the police station)
Crime news : 'नो पार्किंग'मधली गाडी उचलली, म्हणून तो गन घेऊन पोहचला पोलीस ठाण्यात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ट्राफिक पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा दोन तरुणांना पिस्तुलासह अटक केली
  • मुख्य बाजारामध्ये नो पार्किंगमध्ये लावलेली गाडी उचलून वाहतूक शाखेत आणली
  • संतापलेले तरुण पिस्तुल घेऊन पोलीस ठाण्यात

सातारा : सातारा ट्राफिक पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा दोन तरुणांना पिस्तुलासह अटक केली आहे. सातारा शहरातील मुख्य बाजारामध्ये नो पार्किंगमध्ये लावलेली गाडी उचलून वाहतूक शाखेत आणल्याने संतापलेले तरुण पिस्तुल घेऊन पोलीस ठाण्यात आल्याचा ट्राफिक पोलिसांचा दावा आहे. आरोपी गणेश हणमंत देवरे (वय २६, रा. गुरसाळे, ता. खटाव) व विक्रम प्रल्हाद देवरे (वय २६, रा. दहिवडी, ता. माण) या दोघांनी रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सातारा वाहतूक पोलीस शाखेत पिस्तूल घेऊन प्रवेश केला. (He picked up the car from 'No Parking', so he took the gun to the police station)

सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रविवारी सायंकाळी नो पार्किंगमधील एक दुचाकी (एमएच ०३, बीझेड ५९९७) टोइंग करून वाहतूक शाखेत आणली. त्यानंतर काही वेळाने रागारागात दुचाकीचा मालक गणेश देवरे व विक्रम देवरे संबंधित गाडी नेण्यासाठी वाहतूक शाखेत आले. तेव्हा ते दोघे पोलीस कर्मचारी देवानंद बर्गे आणि अमर काशीद यांनी गाडी नो पार्किंगमध्ये नव्हती, असा आरोप करत  हुज्जत घालण्यास सुरूवात केली.

त्यावेळी हुज्जत घालत असताना दोघे अधूमधून खिशात हात घालत होते. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला घट्ट मिठी मारून त्याची अंग झडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ पिस्तूल सापडले. पोलिसांनी त्याच्याकडे चाैकशी केल्यानंतर संबंधित पिस्तूल हे परवानाधारक व्यक्तीचे आहे. मात्र, या व्यक्तीचा आणि त्या पिस्तूलाचा काहीही संबंध नाही.  असे  असताना त्याच्याकडे हे पिस्तूल आले कसे, असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला आहे.

या घटनेमुळे सातारा शहर परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी ही पिस्तुल जप्त केली असून त्या दोन्ही युवकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी