एक डाऊट अन् तीन जण आऊट! प्रेयसीचा घोठला गळा, दोन चिमुरड्यांना मारलं विहिरीत बुडवून

Satara Crime : सातारा जिल्ह्यातील एका गावात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या अनैतिक संबंधातून तिचा आणि तिच्या दोन चिमुरड्यांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

He strangled his girlfriend with an immoral relationship and drowned two children in a well
एक डाऊट अन् तीन जण आऊट! प्रेयसीला घोठला गळा, दोन चिमुरड्यांना विहिरीत बुडवून मारलं ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अनैतिक संबंधातून तिहेरी हत्याकांड
  • प्रेयसीचा गळा दाबून केला खून
  • तर दोन लहान मुलांना विहिरात फेकून त्यांना मारलं

सातारा : अनैतिक संबंधातून प्रियकराने त्याची प्रेयसी आणि तिच्या दोन मुलांचा हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारीसमोर आली. कोरेगाव तालुक्यातील वेलंग या गावात घडली.या हत्याकांडामध्ये प्रियकराने प्रेयसीचा गाळ घोटून ती तिच्या दोन चिमुरड्यांना अंधारात विहिरीमध्ये फेकून दिले. विहिरीतील त्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. (He strangled his girlfriend with an immoral relationship and drowned two children in a well)

अधिक वाचा :

मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक, अनिल देशमुखांची याचिका फेटाळली, राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही मतदान करू शकणार नाही

या प्रकरणी रहिमतपूर पोलिसांनी तिहेरी हत्याकांड करून फरार झालेल्या संशयिताला संशयित आरोपीला सोलापूर जिल्ह्यातील कामेगाव, ता. अकलूज येथून अटक केली.   दत्ता नारायण नामदास (वय २८, मूळ रा. राजे बोरगाव, जि. उस्मानाबाद) असे या संशयित आरोपीचे नाव आहे.

अधिक वाचा :

RATNGIRI | राज्यसभेचा निकाल लागला आहे, तसाच विधानपरिषदेचा निकाल लागेल - निलेश राणे 

याप्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी सांगितले की, ऊसतोडणी कामगार दत्ता नामदास साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यानंतर ऊस तोडणाऱ्या टोळीबरोबर मूळ गावी गेला नाही. तो कोरेगाव तालुक्यातील वेलंग, शिरंबे येथे राजेंद्र सपकाळ यांच्या घरामध्ये भाड्याने खोली घेऊन योगिता बापूराव हुंडे (वय ३८, रा. उस्मानाबाद) आणि मुले समीर (१४) व तनू (१३) यांच्यासमवेत राहत होता.

अधिक वाचा :

Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात २१७४९ कोरोना Active, आज ४१६५ रुग्ण, ३ मृत्यू

दत्ता आणि योगिता हे दोघे पती-पत्नी नव्हते. तरीही काही ते एकमेकांसोबत राहत होते. योगिताचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यावरून दोघांमध्ये सातत्याने खटके उडत होते. बुधवारी रात्रीही दोघांची भांडणे झाली. यावेळी त्याने घरातच योगिता हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने मुले समीर व तनू यांना बाहेर जायचे आहे, असा बहाणा करून उठवले व दुचाकीवरून मळ्यातील एका विहिरीवर नेले. अंधारात दोघांना विहिरीत ढकलून दिले. या दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

हा खून केल्यानंतर दत्ता वेलंग येथून निघून गेला होता. गुरुवार, १६ जून रोजी सायंकाळी खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने घर मालक राजेंद्र सपकाळ यांना संशय आला. त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळ येऊन पंचनामा केला. दरम्यान, घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम शुक्रवारी उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, संशयित दत्ताला अकलूज येथून ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी