धनुष्यबाण शिंदेंना मिळेल की उद्धव ठाकरेंना; उद्या निवडणूक आयोगात सुनावणी

गावगाडा
भरत जाधव
Updated Jan 16, 2023 | 19:47 IST

केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission of India)उद्या धनुष्यबाण या पक्ष चिन्ह आणि नावाविषयी सुनावणी होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण येतं का उद्धव ठाकरेकडेचं ते राहणार हे स्पष्ट होणार आहे. उद्या संध्याकाळी चार वाजता होणार ही सुनावणी पार पडणार आहे.

Hearing in Election Commission tomorrow for Bow and arrow party sign
केंद्रीय निवडणूक आयोगात पक्षचिन्ह आणि नावासाठी सुनावणी   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई  : केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission of India)उद्या धनुष्यबाण या पक्ष चिन्ह आणि नावाविषयी सुनावणी होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण येतं का उद्धव ठाकरेकडेचं ते राहणार हे स्पष्ट होणार आहे. उद्या संध्याकाळी चार वाजता होणार ही सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून अनिल देसाई निवडणूक आयोगात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.  (Hearing in Election Commission tomorrow for Bow and arrow party sign)

अधिक वाचा  : दानवेंचं नाव असलेला तीस-तीस घोटाळा आहे तरी काय

 दरम्यान यापूर्वी 10 जानेवारीला केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या पक्ष चिन्हाविषयी सुनावणी झाली होती.  या सुनावणीत शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला होता.   सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगात सुनावणी घेऊ नये. किंवा निवडणूक आयोगातील सुनावणी ही प्राथमिक की अंतिम आहे हे स्पष्ट करावं, अशी मागणी सिब्बल यांनी केली.

अधिक वाचा  : मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत बाबरचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

सिब्बल यांचा हा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपण सर्व ऑर्डर एकदाच देऊ, असं सिब्बल यांना स्पष्ट सांगितलं. त्यानंतर शिंदे गटाच्या दोन वकिलांनी अतिशय प्रभावीपणे आपली भूमिका मांडली. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतला. तर ठाकरे गटाला युक्तीवादासाठी 17 जानेवारीची तारीख जाहीर करण्यात आली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी